गौरव जयंत काथवटे यांचे अखेर नगरसेवक पद धोक्यात
लातूर/प्रतिनिधी :- गौरव जयंतराव काथवटे यांचे खाटीक या जातीचे प्रमाणपत्र योग्य का अयोग्य याची चौकशी सुरु करण्याचे आदेश जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती लातूर यांनी दिनांक 15 मार्च 2021 रोजी घोषीत केले आहे.
श्री ओमप्रकाश चंद्रनाथ आर्य यांनी लातूर येथील जात पडताळणी समिती यांचेकडे श्री गौरव जयंत काथवटे यांचे खाटीक या अनुसुचित जातीचे प्रमाणपत्र त्यांनी समितीची दिशाभुल करुन मिळवले आहे व ते खोटे आहे अशी तक्रार दाखल केली . त्यामध्ये श्री ओमप्रकाश आर्य यांनी असे प्रतीपादन केले आहे की , गौरव जयंत काथवटे हे धनगर जातीचे आहेत . त्यांचे वडील जयंत काथवटे व त्यांचे सर्व कुटुंबीयांच्या शाळेच्या व जुन्या नोंदीमध्ये धनगर या जातीचे प्रमाणपत्र असले तरी त्यांनी अद्याप त्याची वैधता जाती दावा पडताळणी समितीकडून करुन घेतलेली नाही . एवढेच नसुन गौरव काथवटे यांच्या वडीलांकडे खाटीक जातीचे वैधता प्रमाणपत्र नसताना गौरव काथवटे यांना खाटीक या जातीचे वैधता प्रमाणपत्र कसे देण्यात आले असे मुद्दे उपस्थीत केले . त्याला उत्तर देताना श्री गौरव काथवटे यांनी श्री ओमप्रकाश यांना तक्रार दाखल करण्याचाच अधिकार नाही असा आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला परंतू सदरचा श्री गौरव जयंत काथवटे यांचा आक्षेप जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी नामंजूर केला व श्री गौरव जयंत काथवटे यांच्या खाटीक या अनुसुचित जातीची वैधता तपासण्याचे काम सुरु केले आहे . सन 2012 पासुन श्री ओमप्रकाश चंद्रनाथ आर्य यांनी जयंत काथवटे व त्यांचे कुटुंबिय यांनी खाटीक या अनुसुचित जातीचे प्रमाणपत्र लबाडीने व शासनाची दिशाभुल करुन मिळवलेले आहे असा रीतसर तक्रारी दाखल केल्या आहेत त्यापैकी काही हायकोर्टात सुनावणीसाठी प्रलंबीत आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.