जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 24 रुग्ण ; तर 25 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज
· 250 रुग्णांवर उपचार सुरु
हिंगोली, (शेख इमामोद्दीन ) दि. 01 : जिल्ह्यात 24 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसर 05, वसमत परिसर 02 व्यक्ती, औंढा परिसर 01 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 13 व्यक्ती, औंढा परिसर 02 व्यक्ती, सेनगाव परिसर 01 व्यक्ती असे एकूण 24 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 25 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 10 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 02 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 12 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 4 हजार 139 रुग्ण झाले असून, त्यापैकी 3 हजार 829 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 250 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 60 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.
****
वृत्त क्र. 92
कामगारांना किमान वेतनापेक्षा कमी दराने वेतन देऊ नये
सरकारी कामगार अधिकारी यांचे आवाहन
हिंगोली, (जिमाका) दि. 01 : कामगार विभागाने सन 2020-21 मध्ये किमान वेतन अधिनियम-1948 या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी दिनांक 22 फेब्रुवारी, 2021 ते 28 फेब्रुवारी, 2021 या कालावधीत जनजागृती अभियान राबविण्याचे आदेश राज्य कामगार आयुक्तांनी दिले होते.
त्याअनुषंगाने सरकारी कामगार अधिकारी, हिंगोली यांच्यातर्फे दि. 26 फेब्रुवारी, 2021 रोजी एम.आय.डी.सी. लिंबाळा परिसरातील कारखाने, उद्योग, विटभट्टी उत्पादक उद्योग आणि इतर असंघटीत क्षेत्रात किमान वेतन अधिनियम-1948 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जनजागृती अभियान राबविण्यात आले.
या अभियानात जिल्ह्यातील मालक वर्ग यांनी कामगारांना किमान वेतनापेक्षा कमी दराने वेतन देण्यात येवू नये, असे सरकारी कामगार अधिकारी टी. ई. कराड यांनी आवाहन केले .
या अभियानास येथील सरकारी कामगार अधिकारी टी. ई. कराड , दुकाने निरीक्षक जी.एस.जडे, नितीन दवंडे, तसेच मालक व कामगार वर्ग उपस्थित होते.
*****
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.