संभाजीनगर, खाडगावरोड येथे दलीतोत्तर विकासनिधीतून ८ लाख ४६ हजार निधीचे नालीकाम पूर्ण आश्वासन पूर्तते बददल नागरीकांनी मानले आभार

 

संभाजीनगर, खाडगावरोड येथे दलीतोत्तर विकासनिधीतून

८ लाख ४६ हजार निधीचे नालीकाम पूर्ण

आश्वासन पूर्तते बददल नागरीकांनी मानले आभार

१७ मार्च २१ :

लातूर 

युसूफ सय्यद प्रतिनिधी










  राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख लातूर शहर विधानसभा निवडणूक प्रचाराच्या निमीत्ताने प्रभाग क्रमांक १३ मधील संभाजीनगर, खाडगाव रोड मुस्तफा कॉलनी येथे गेले होते. त्यावेळी तेथील नागरिकांनी त्यांची भेट घेऊन मूलभूत सुविधासाठी लिवो मेडिकल दुकान व सोहेल काझी यांचा घर आणि परिसरात नाली बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्री देशमुख यांनी सदरील काम करून देण्यात येईल असे आश्वासन नागरीकांना दिले होते.

   प्रभाग क्रमांक १३ मधील संभाजीनगर, खाडगाव रोड, मुस्तफा कॉलनी परिसरातील नागरिकांनी आणि तेथील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीप्रमाणे सदरील कामासाठी ना. अमित विलासराव देशमुख यांच्या सुचने प्रमाणे लातूर शहर महानगरपालीका बांधकाम विभागाकडून दलीतोत्तर निधी अंतर्गत ८ लाख ४६ हजार रुपये विकास निधी देऊन तेथे नाली बांधकाम आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

   नागरीकांच्या मागणी प्रमाणे मुस्तफा कॉलनी लिओ मेडीकल ते सोहेल काझी यांच्या निवासस्थान पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने नाली बांधकाम करण्यात आले आहे. कंत्राटदार विदयासागर कंबोज यांनी सदरील काम मजबूत व गुणवत्तापूर्ण केल्या बददल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

   पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी निवडणुकीत दिलेला शब्द खरा करून नाली बांधकामासाठी ८ लाख ४६ हजार रुपये विकास निधी दिला आहे. प्रभागातील नागरीकांना दिलेल्या आश्वासन पूर्ततेसाठी पप्पू देशमुख, योजना कामेगावकर, वसीम काझी, शेख महम्‍द, कमल सोमवंशी, सुरज सोळुंके, शकील काझी आदी नागरिकांनी आभार मानले आहेत.

----------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या