प्रभुराज प्रतिष्ठाण व लातूर अर्बन को-ऑप. बॅक ली. लातूर च्या वतीने उद्योग भवन परिसरात पक्षांना पाणी पिण्याची सोय...........

 

प्रभुराज प्रतिष्ठाण व लातूर अर्बन  को-ऑप. बॅक ली. लातूर च्या वतीने उद्योग भवन  परिसरात पक्षांना पाणी पिण्याची सोय............





युसूफ सय्यद प्रतिनिधी 
दी.१७.३.२०२१ रोजी लातूर अर्बन को-ऑप. बँक ली. व  प्रभुराज प्रतिष्ठाण,लातूर च्या सयूंक्त विद्ममाने  पक्ष्यानां पाणी  पिण्याची  सोय करण्यासाठी  येळण्या बँक परीसरात  बांधण्यात  आले तसेच नागरिकांनीही पक्ष्याची सोय करण्यासाठी  मातीचे भांडी (येळनी ) देण्यात  आले.उन्हाळ्याच्या दिवसात चारा पाण्याविना पक्ष्याची भटकंती होत आहे.  पाण्याच्या शोधात वणवण भटकत असल्याचे दिसून येत असल्याने  त्यांची भटकंती,  तडफड कमी करण्यासाठी प्रभुराज प्रतिष्ठाण च्या वतीने  वृक्षांना येळण्या बांधण्यात आल्या आहेत. लातूर अर्बन बँक  येथे  पक्ष्यासाठी येळनी बांधून लोंकाच्या सह्याने  पशु पक्षासाठी पाण्याची सोय करण्यात येणार आहे. त्याशिवाय असे कांही ठिकाणी ही वृक्षाना येळणी बांधण्यात येईल तसेच नागरिकांनी असे उपक्रम राबवावे  ही विनंती करण्यात  येईल की आपल्या छतावर व अंगणात असलेल्या झाडाला  पक्ष्यासाठी  पिण्याच्या पाणीची सोय करावी जेणे एक सामाजिक उपक्रम आपल्या साह्याने होईल.उन्हाच्या तीव्रतेमुळे पशुपक्ष्यांच्या चारा पाण्याचा प्रश्न निर्माण होतो तो अडचण दूर करण्यासाठी  हा उपक्रम  करण्यात येत आहे.. यावेळी प्रतिष्ठाणचे अँड.अजय कलशेट्टी,बॅंकचे मुख्य कार्यकारी वाय. एस. मशायक,सर व्यवस्थापक एस. एच. खठोड,  विक्रमी रक्तदाते पारस चापसी,अँड.सुरेश सलगरेअँड.कल्पना भुरे,अँड.सुनंदा इंगळे,रश्मी भंडारी,लता सावंत,चंद्रशेखर वडजे,दीपक टोपले, शिवा धुळे,बंडप्पा जवळे, सुखदेव कॉमडाले, व इतर कर्मचारी वर्ग  आदी उपस्थित होते.



--
Photo By- Narayan Pawle (Tamma) Latur
Mobile No. 9422071717

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या