मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला पुरेसा निधी देण्याबाबत व इतर मागण्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्र्यांना सादर....
औसा प्रतिनिधी /-मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याबाबत व इतर मागण्यांचे निवेदन 'कोरोना' आरोग्य सेतू अँपच्या नियमाचे पालन करत एमआयएम औसा तर्फे तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री व अल्पसंख्यांक मंत्रीना निवेदन सादर केले आहे. गेल्या ६ वर्षापासून मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला कसल्याही प्रकारचा निधी उपलब्ध मंजूर झाला नाही. शिष्यवृत्ती, शैक्षणिक कर्ज, सुशिक्षित बेरोजगार योजनांतर्गत कर्ज वाटपही झाले नाही तसेच निधी उपलब्ध नसल्याने अल्पसंख्यांक समाजाला या योजनांपासून वंचित राहावे लागत असल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकारने चालू अधिवेशनात निधीची तरतूद करावी व महाराष्ट्रातील नगरपालिकेस अल्पसंख्याक बहुल क्षेत्रासाठी विकास निधी द्यावा, जिल्हास्तरीय अल्पसंख्यांक कल्याण समित्या स्थापन कराव्यात, मौलाना महामंडळास भरीव आर्थिक निधीची तरतूद करावी, मुस्लिम समाजाला आरक्षण लागू करावे, राज्यातील पालिकेस अल्पसंख्यांक कल्याण निधी निर्गमित करावा,मौलाना महामंडळाच्या नवीन कार्यकारणी, संचालक मंडळाची निवड करावी, राज्यात प्रत्येक जिल्ह्याला स्वतंत्र मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालय चालू करावीत, 'कोरोना'च्या लॉकडाऊन काळातील घरगुती वापराचे वीज बिल माफ करण्यात यावे असे निवेदन नायब तहसीलदार वृषाली केसकर यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन एमआयएम औसा तर्फे अॅड. गफरुल्ला हाश्मी, तालुका प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार, अॅड. आर एम शेख, इरफान बागवान, शेख इस्माईल यांच्या उपस्थितीत आरोग्य सेतू ॲप नियमाचे पालन करून निवेदन देत नवाब मलिक अल्पसंख्यांक मंत्री, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्यासह जिल्हाधिकारी लातूर, पोलिस निरीक्षक औसा यांना देण्यात आले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.