राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत अनुराग सावंत प्रथम आल्याबद्दल श्री महादेव मंदिर देवस्थान कमिटी व ग्रामपंचायत कार्यालय भुतमूगळी यांच्या संयुक्त विद्यमाने जाहीर सत्कार..
श्री छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती लातूर ( अॅड् उदय गवारे) यांच्या द्वारे आयोजित राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत भुतमूगळीचे सुपुत्र चि. सावंत अनुराग नेताजी यांनी प्रथम क्रमांक पटकावला तसेच बीड येथील विद्यावार्ता या सुप्रसिद्ध मॅग्झनच्या वतीने (डॉ. बापू घोलप ) आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन वकृत्व स्पर्धेतही अनुरागने महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळविला , तसेच श्री शिवछत्रपती प्रतिष्ठान आयोजित सार्वजनिक शिवजयंती महोत्सव सारोळा -एरंडी यांच्यावतीने आयोजित वक्तृत्व स्पर्धेतही त्याने प्रथम क्रमांक पटकावून विजयाची हॅट्ट्रिक साधून आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची झलक दाखवून प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्हावर आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरून भूत मुगळी गावचे नाव महाराष्ट्रात उज्वल केल्याबद्दल श्री महादेव मंदिर देवस्थान कमिटी व ग्रामपंचायत कार्यालय भुतमूगळी यांच्या संयुक्त विद्यमाने पालकांसह अनुरागचा भव्य सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी ग्रामदैवत शंभू महादेवाची आरती करून विकास रत्न लोकप्रिय सरपंच मा. श्री मधुकररावजी गायकवाड , लोकप्रिय उपसरपंच मा .श्री सतीशराव चव्हाण , महादेव मंदिर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष मा. श्री सुधाकररावजी चव्हाण चेअरमन माननीय श्री रामकिशनजी सावंत , माजी तंटामुक्ती अध्यक्ष मा. श्री. दाजीबा सावंत , कालिदास चव्हाण यांच्या शुभ हस्ते शाल, श्रीफळ , फेटा बांधून पुष्प बुके व ग्रामदैवत शंभू महादेवाची फोटो देऊन अनुरागसह पालकांचा भव्य सत्कार करण्यात आला. व बँड - ताशाच्या गजरात पेढे वाटप करण्यात आले.
त्यांच्या या यशाबद्दल भुतमूगळी गावचे सरपंच , प्रथम नागरिक , विकास रत्न मामाश्री मधुकररावजी गायकवाड , धडाडीचे उपसरपंच मा. श्री सतीशराव चव्हाण सोसायटीचे चेअरमन रामकिशनभय्या सावंत , माजी तंटामुक्तीअध्यक्ष मा. श्री दाजीबा सावंत , हरिभाऊ पाटील, कालिदास चव्हाण , संजय स्वामी , हरिभाऊ चव्हाण , प्रताप सोळंके , धोंडीराम बिराजदार , माजी सरपंच दिगंबर सावंत, शिवाजी पाटील , हरिभाऊ सावंत , बाळासाहेब पांडुरंग पाटील , धीरज वाडीकर , ओम नेलवाडे ,गोविंद सावंत , मनोहर सावंत , संतोष सावंत , युवराज शिवरे , सचिन चव्हाण , दगडू सावंत , बालाजी सावंत ,नेताजी पाटील , संजय पाटील , शिवराम भालके, तसेच गावातील अबालवृद्धांनी अनुरागवर कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
महादेव मंदिर देवस्थान कमिटी व सरपंचांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केल्यामुळे गावातील सर्वच विद्यार्थ्यांना एक नवीन प्रेरणा व चालना मिळत आहे. त्यामुळे सरपंच , चेअरमन व अध्यक्षांचे हे कार्य सर्वत्र आदर्श घेण्यासारखे आहे. त्यांच्या प्रेरणेने नवीन पिढी ही चांगलीच घडणार यात तिळमात्र शंका नाही.
या विकासरत्नामुळेच भूतमुगळी गावचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. यांच्या नेतृत्वाखालीच शंभू महादेवाचे 108 फूट उंचीचे मंदिर आज उभे आहे .संपूर्ण महाराष्ट्राने आदर्श घ्यावा,असे त्यांचे हे कार्य आहे.
.........................................
..........................................
अनुराग सावंत यांनी ऋणात राहणेच केले पसंत..............
सत्काराला उत्तर देताना अनुरागने आपले विचार व्यक्त केले कि ,
मा.सरपंच, मा.उपसरपंच, मा.अध्यक्ष, मा.चेअरमन , मा.पोलीस पाटील, तसेच समस्त भुतमूगळी ग्रामस्थांनी माझे केलेले कौतुक, अभिनंदन व सत्कार याबद्दल फक्त आभार मानून मी ऋणातून मुक्त होऊ शकत नाही, त्याबद्दल माझ्याकडे शब्द अपुरे आहेत, आपल्यामुळे मला खूप मोठी ऊर्जा, व प्रेरणा मिळाली असून, यापुढेही अशीच ऊंच भरारी घेण्यासाठी आपल्यामुळे माझ्या पंखात बळ नक्कीच येईल , त्यामुळे आपले आभार मानण्याऐवजी मी समस्त गावकऱ्यांच्या ऋणात राहू इच्छितो , व यापुढेही शंभू महादेवाची कृपा व आपला सर्वांचा आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी असावा व भविष्यात मला माझ्या गावची सेवा करण्याची संधी मिळावी , अशी मी शंभू महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो.🙏🙏
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.