कोरोना चाचणीसाठी ग्रामीण रुग्णालयात तोबा गर्दी
तपासणी की दर्शनाच्या दर्शनाच्या रांगा?
औसा मुख्तार मणियार
औसा- नगर परिषदेने व्यापाऱ्यांना कोरोना विषाणू ची चाचणी करून चाचणी अहवाल दुकाने व व्यापारी आस्थापनांमध्ये दर्शनी भागात लावा अन्यथा दुकाने सील करण्यात येतील असे बजावले असून कोरोना चाचणी साठी 21 मार्च ही शेवटची मुदत दिली आहे परंतु औशाच्या ग्रामीण रुग्णालयात तपासणी करण्याची यंत्रणा कमी असल्याने शनिवार दि 20 मार्च 2021रोजी येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना चाचणी करण्यासाठी तोबा गर्दी होत असून कोरोना चाचणीसाठी आले की मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की केल्यागत परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले.
एखाद्या मंदिरात दर्शनासाठी होते तशी गर्दी व्यापारी नागरिकांनी येथील ग्रामीण रुग्णालयात करणे उचित नाही तपासणीसाठी आलेल्या मध्ये एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असेल तर त्याच्यामुळे इतरांच्या प्रकृतीला धोका निर्माण होऊन दुसऱ्यांना कोरोणाची लागण विनाकारण होऊ शकते याची तपासणी करण्यासाठी औसा येथील ग्रामीण रुग्णालय शिस्तबद्ध पद्धतीचा अवलंब होणे गरजेचे आहे.महाभयंकर रोग असल्यामुळे जगभरात भीतीचे सावट पसरले असताना येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी सोशल डिस्टन्स नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे तपासणीसाठी येणारे व्यापारी यांनी आरोग्य सेतू ॲप नियमांचे काटेकोरपणे करून स्वतः आपल्या कुटुंबाच्या आरोग्य रक्षणासाठी सतर्क राहणे आवश्यक आहे ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी वर्गाने ही कोरोनाविषाणू ची चाचणी करण्यासाठी येणाऱ्यांना चाचणी करण्यासाठी येणाऱ्यांना कर्मचारी संख्या वाढवून शिस्तीत तपासणी करण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी होत आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.