महाकृषी ऊर्जा पर्व अभियंता अंतर्गत विज बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार
औसा मुख्तार मणियार
महाराष्ट्र शासन व महावितरण यांच्या संयुक्त विद्यमानाने 2015 पूर्वीची व नंतरची कृषी पंपाची थकबाकी भरण्यासाठी शेतकऱ्यांना सवलत योजना देण्यात आल्याने औसा तालुक्यातील कृषी पंपाची संपूर्ण थकबाकी भरण्याचा काही शेतकऱ्यांचा औसा येथील शासकीय विश्रामगृहात प्रतिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. राज्यभरात 30 हजार कोटी रुपयाची शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची थकबाकी माफ करण्याचा क्रांतिकारी निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
चालू वर्षात संपूर्ण थकबाकी भरणा भरण्या-या कृषी पंप धारक शेतकऱ्यांना जवळपास 66 टक्के वीज बिलामध्ये सवलत देण्यात येणार आहे. परंतु ही रक्कम त्यांना मार्च 2021 पूर्वी भरावयाची आहे. 2022 पर्यंत भरल्यास 30 टक्के तर 2023 पर्यंत भरल्यास 20 टक्के वीज बिलातून सवलत देण्यात येणार असून, दंड आणि व्याजातही सूट देण्याचा निर्णय महावितरणने घेतला असल्याची माहिती भारत जाडकर मुख्य अभियंता, महावितरण मुंबई यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
थकबाकी वसूल झालेली ते 30 टक्के रक्कम स्थानिक पातळीवर तर्फे त्याची टक्के रक्कम जिल्हास्तरावर खर्च करून महावितरणचे इन्फास्टकचर सुधारण्यासाठी वापरण्यात येणार असून उर्वरित 34 टक्के रक्कम कार्यालयात देण्यात येणार असल्याची अधिक्षक अभियंता दिलीप भोळे लातूर यांनी सांगितले. येणाऱ्या काळात महावितरण शेतकऱ्यांची पडीक जमीन प्रतीक एकर 30 हजार रुपये वार्षिक भाडेतत्त्वावर घेऊन सौर ऊर्जा प्रकल्प उभारून कृषी व्यवसायासाठी विद्युत पुरवठा करणार असल्याचेहीसांगण्यात आले
निलंगा विभागात 51,151 शेतकरी असून आतापर्यंत 292 शेतकऱ्यांची कृषी धोरण 2020 अंतर्गत कृषी पंपाचे संपूर्ण थकबाकी भरून नेता लाभ घेतला आहे. निलंगा विभागातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषी पंपाची थकबाकी भरून विज बिल माफी योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान मुख्य अभियंता यांनी केले. यावेळी कृषी पंपाच्या वीज बिलाच्या पाचवी ची सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमात काही शेतकऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये विज बिल माफीचे सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल गाडे यांनी केले यावेळी महावितरणचे कर्मचारी व योजनेचा लाभ घेणारे शेतकरी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.