गोंद्री मोड ता. औसा येथील भुमाता फार्मर प्रोड्युसर कंपनी संचालित शेतमाल खरेदी केंद्रावर हमीभावाने हरभरा खरेदीचा शुभारंभ केला.
औसा मुख्तार मणियार
आज गोंद्री मोड येथील भुमाता फार्मर प्रोड्युसर कंपनी संचालित शेतमाल खरेदी केंद्रावर हमीभावाने हरभरा खरेदीचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांच्या हस्ते करण्यात आला
"लातूर हा महाराष्ट्रात हरभऱ्याचे सर्वाधिक उत्पादन घेणारा जिल्हा आहे. यंदा मुबलक पाऊस झाला असल्याने हरभरा क्षेत्र वाढले असून जिल्ह्यात २ लक्ष हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर हरभरा पीक घेतले गेले आहे. शेतकऱ्यांकडील संपूर्ण हरभऱ्याची खरेदी होणे आवश्यक आहे" हेक्टरी 13.5 क्विंटल प्रमाणे हरभरा खरेदी करण्यात येत आहे तरी शेतकऱ्यांनी 5100 रूपये हमीभावाने हरभरा विक्री साठी नोंदणी करावी व हमीभावाचा लाभ घ्यावा असे मत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांनी व्यक्त केले.
यावेळी संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य श्रीहरी काळे, गोंद्री उपसरपंच नारायण भोसले, धानोरा सरपंच सुरेश मुसळे, उपसरपंच नागेश कोळपे, भुसणी माजी उपसरपंच बजरंग माने, खरेदी विक्री संघाचे संचालक मारूती मगर, बाजार समितीचे संचालक मनोज सोमवंशी, मोहीत पाटील, उपतालुका प्रमुख शंकर लंगर, बादल काळे, रणजित कोळपे, महेश लंगर, गणेश जाधव, केशव डांगे, हंसराज लंगर, महेश लंगर उपस्थित होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.