मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
दंडित नागरिकांना
मास्कची भेट
घराबाहेर पडताना मास्क वापरण्याचे मनपाचे आवाहन
लातूर/प्रतिनिधी: कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी प्रत्येक नागरिकाने घराबाहेर पडताना मास्क वापरावा,असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांवर पालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जात असून दंड केलेल्या नागरिकांना मास्क भेट देत त्याचा वापर करण्याचे आवाहन केले जात आहे.
गेल्या काही दिवसात शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.या आजारापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा,शारीरिक अंतराच्या नियमाचे पालन करावे,असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने वारंवार केले जात आहे.असे असतानाही अनेक नागरिक विनामास्क सार्वजनिक ठिकाणी वावरत आहेत. आवाहन करूनही नागरिक प्रतिसाद देत नसल्याने पालिकेच्या वतीने आता दंडात्मक कारवाई केली जात आहे.जे नागरिक विनामास्क आढळतील त्यांच्याकडून आर्थिक स्वरूपात दंड वसूल केला जात आहे.केवळ दंड वसूल करून पालिकेचे कर्मचारी थांबत नाहीत तर अशा नागरिकांना लगेचच मास्क देऊन तो वापरण्याची विनंती केली जात आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शहरातील नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा.बाजारपेठ अथवा सार्वजनिक ठिकाणी शारीरिक अंतराच्या नियमाचे पालन करावे,असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.विना मास्क नागरिक आढळले तर दंडात्मक कारवाई केली जाईल,असा इशाराही महानगर पालिकेने दिला आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.