औसा येथील युवकाणी लंगरपट्टी कब्रस्थानचे स्वरुप बदलण्याचे संकल्प

औसा प्रतिनिधी



शहरातील काही युवकांनी नवीन शक्कल लढवली असून पुर्वजांची आठवण व्हावी,त्याच्यावर दिवसातून एखदा (दरुद)चे पठण करावी.याकरिता येथील लंगरपट्टी कब्रस्थानचे स्वरुप बदलण्याचे संकल्प केला. यातून दफनभूमीचे नंदनवन होणार असून याची सुरुवात केली आहे. रात्रीच्या वेळी अंधाराच्या काळोखात असलेल्या दफनभूमीत रात्री अंत्यसंस्कार करण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या.पावसाळ्याच्या दिवसात तर रात्री अंत्यविधी करण्यास टाळाटाळ केली जात होती.पण ही समस्या आता संपुष्टात आली असून स्वखर्चाने १५ लोखंडी पोल उभारुन त्याव्दारे परिसर प्रकाशमय केला आहे .याचे कामही अंतिम टप्प्यात असून यासह संपूर्ण कब्रस्थानची स्वच्छता करण्यासह सुगंधी फुलासह फळ व विविध प्रकारच्या झाडांची लागवडही करण्यात येणार आहे. या कामाचा पुढाकार युवकांनी घेतल्याने कामात सातत्यासह मजबूती ही आहे.याकरिता वसीम खोजन,डॉ. अफसर शेख,इम्रान सय्यद, हाकीम सय्यद,मुसीर सर,फुरखान सय्यद,फहाद अरब,सुलतान शेख,मुजाहेद शेख,अकबर खोजन,गणी शेख,शफिक सावकार, खिजर कुरेशी, फय्याज शेख,मुबीन कुरेशी,नदीम सय्यद, जुबेर खोजन आदि परिश्रम घेत आहेत. यांच्या सहभागातूनच हा संकल्प साकारतोय.यासह वसीम खोजनसह त्यांचे सहकारी श्रमदान ही करुन दररोज योगदान देत असल्याने त्यांचे कौतुक केले जाते.शहरात हा आगळावेगळा संकल्प युवकांच्या सहभागातून साकारत असल्याने सर्वत्र यांची चर्चा होतो.सर्वाकरिता हा एक आदर्श ठरु शकतो.


https://youtu.be/rCrF1iPvdwM



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या