अशोक पाटील निलंगेकरांसह २६ जणांवर गुन्हा दाखल
निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
निलंगा : जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली करत कोविड काळात एकञ येऊन आंदोलन केल्याप्रकरणी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर सह २६ आंदोलन कर्त्यावर निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केंद्र शासनाने पारित केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात काँग्रेस पक्षाच्या आदेशानुसार कार्यकर्त्यांसह निलंग्यात काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले माञ अनेक लोक एकञ येऊ नये म्हणून कोरोना काळात जिल्हाधिकारी पुथ्वीराज. बी. पी. यांनी सण उत्सव आंदोलन मोर्चे काढू नये असे आदेश काढला असताना देखील दि. २६ रोजी येथील उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन केल्याप्रकरणी जमाबंदी कायद्याअंतर्गत अशोक पाटील निलंगेकर,अभय साळुंके,गोविंद शिंगाडे,गोविंद सुर्यवंशी,विजयकुमार,दयानंद चोपणे,नारायण सोमवंशी,महेश देशमुख,सुरेंद्र धुमाळ,पंकज शेळके,शरद गायकवाड,अमरजित मरगणे,तानाजी डोके पाटील,लाला पटेल,तुराब ईलाही बागवान,सोमनाथ कदम सुधाकर पाटील,अजय कांबळे,यांच्यासह २६ आंदोलनकर्त्यांवर निलंगा पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी प्रणव काळे यांच्या फिर्यादिवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.