दिव्यांगांना सहायता उपकरणांचे वितरण

 

दिव्यांगांना सहायता उपकरणांचे वितरण




महानगरपलिकेच्या वतीने लाभार्थ्याना घरपोच साहित्य वाटप
 लातूर/प्रतिनिधी: लातूर शहरातील ९३१ लाभार्थ्यांना दिव्यांग सहायता उपकरणांचे वाटप लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने घरपोच वितरण करण्यात आहे. अलिमको संस्थेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेले साहित्य महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार,आयुक्त अमन मित्तल, विरोधी पक्षनेते दीपक सूळ, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र प्रमुख सुरेश पाटील यांच्या उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरुपात ५ लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले. 
  जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र प्रमुख संवेदना प्रकल्पाचे प्रमुख सुरेश पाटील यांच्या पुढाकारातून दिव्यांग व्यक्तींसाठी राबविण्यात आलेल्या शिबिरांमधून लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती. मुक बधीर, अंध, शारीरिक अपंगत्व असणाऱ्या लाभार्थ्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार लागणारे सहायता उपकरणे अलीमको या संस्थेतर्फे उपलब्ध करण्यात आले आहे.
दिव्यांग व्यक्तींना अत्याधुनिक श्रवण यंत्र, तीन चाकी सायकल, स्वयं चलित तीन चाकी सायकल, मोबाईल फोन, अत्याधुनिक काठी अशा प्रकारच्या साहित्याचा यात समावेश आहे. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सर्व साहित्य मनपाच्या वतीने घरपोच वितरित करण्याचा सूचना देत साहित्य उपलब्ध करून दिल्याबददल आलिमको संस्था व सुरेश पाटील यांचे आभार व्यक्त केले 
यावेळी नगरसेवक सचिन बंडापल्ले, आयुब मणियार, रघुनाथ मदने, गोरोबा लोखंडे यांच्यासह महानगरपालिकेचे महिला व बाल कल्याण अधिकारी वडगावे, आस्थापना विभाग प्रमुख रमाकांत पिडगे  तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही यावेळी उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या