लातूर वृक्ष व विलासराव देशमुख फाऊडेशन कडून ना.अमित देशमुख
यांच्या वाढदिवसानिमित्त दुर्मिळ वृक्ष वनस्पती संवर्धन उपक्रमाची सुरुवात
लातूर प्रतिनिधी दि.१८ मार्च:
राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर वृक्ष व विलासराव देशमुख फाऊडेशनच्या वतीने दुर्मिळ वृक्ष व वनस्पती संवर्धन उपक्रमाची सुरुवात आज रायगड ऑक्सिजन झोन येथे रेणा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील व टवेन्टिवन शुगर लि.चे व्हा. चेअरमन विजय देशमुख यांच्या हस्ते औदुबंर, वडाचे झाड लावून झाली. आज श्रमदान करून जवळपास ३०० पेक्षा अधिक झाडांना पाणी देण्यात आले.
या उन्हाळ्यात निसर्गाविषयी जनजागृती निर्माण करणारे माहिती पत्रके देऊन याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपक्रमात एमएसडबल्युचे विद्यार्थी, वृक्ष व निसर्गप्रेमी लोक सहभागी झाले आहेत. आपल्या आजुबाजुला घडणारे निसर्गातील बदल, निसर्गातील रहस्य आपण सजगपणे पाहायला शिकवणे. तसेच आपल्या भागातील जैवविविधताची माहिती घेऊन ती जोपासणे, दुर्मिळ झाडे ह्यांची नोंद करणे त्यांचे बी गोळा करणे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात अनेक दुर्मिळ वृक्ष वेली पाहिल्या गेल्या. त्यात मुरमाटी बाभळ, काळा शिसम, खदिरवल्ली वेल, काबा, निर्मळी, मदन फळ, अनंतमुळ, अजाणवृक्ष, ज्योतिषमती, हळदवेल, रुद्रकोरांटी, पाच पानांचा पळस, पांढरा पळस, पांढरा शिरीष, काटेसावर, सोनसावर, पांगरा, पिंपरी असे अनेक दुर्मिळ प्रजातींचा शोध घेतला या जतन करण्यासाठी कार्य पण सुरु केले. जंगलांच्या परिसरात पठारावर साधारणतः फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात वणवे लागतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून जानेवारी आणि मार्चमध्येही वणवे लागल्याच्या घटना घडत आहेत. नैसर्गिक तसेच मानवी हस्तक्षेपातून लागणा-या वणव्यांमुळे मौलिक वनसंपदेचा बळी जात असतो. ते वाचवण्यासाठी पण जनजागृती सुरू केली. या मुक्या प्राण्याचा, पक्ष्यांचा, निसर्गाचा संदेश सहज आणि सोपा आहे तो म्हणजे जगा आणि जगू द्या. हा संदेश लोकांत रुजवणे गरजेचे आणि महत्वाचे आहे म्हणून अश्या उपक्रमाची सुरुवात केली.
या उपक्रमासाठी लातूर वृक्ष चळवळीचे समन्वयक सुपर्ण जगताप, विलासराव देशमुख फाऊडेशनच्या संगिता मोळवणे, डॉ बी आर पाटील, डॉ रमेश भराटे, कृष्णकुमार बांगड, अमृत सोनवणे, व्यंकट गर्जे, अॅड सुनंदा इंगळे, गजानन बोयने, पृथ्वीराज पवार,प्रशांत दुधमांडे, निलेश रेड्डी, ईश्वर चिंचोलकर, बालाजी चामे,अमरदिप गुंजोटे, चंद्रकांत शिंदे, दिगंबर वेदपाठक, यश चव्हाण हे उपस्थित होते.
-------------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.