माईनकर केवळ *माया* गोळा करण्याची शिस्त लावण्यात मग्न !!
कोरोनाचा प्रसार करत आहे लातूर येथील सह दुय्यम निबंधक कार्यालय...
लातुर : दि. १८ - लातूर येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यासाठी होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे हे कार्यालय कोरोना पसरवणारे केंद्र आहे की काय अशीच अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे या गर्दीवर नियंत्रण करावे अशी मागणी लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी केली आहे. सगळ्यात अतिशय भ्रष्ट्राचाराचे ठिकाण म्हणजे रजिष्ट्रार ऑफिस !!! या कार्यालया मध्ये दलालांचाही प्रचंड सुळसुळाट झालेला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन कोरोनाला रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असून विवाह समारंभासाठी सुद्धा केवळ ५० व्यक्तींची परवानगी देण्यात आलेली आहे. तर अंत्यविधीला सुद्धा फक्त २० व्यक्तींना परवानगी दिलेली आहे.
असे असताना लातूरच्या सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये प्रचंड तोबा गर्दी झालेली पाहायला मिळत आहे.
या कार्यालयातले अधिकारी मात्र लोक ऐकत नाहीत आम्ही काय करावे ? असे बेजबाबदारपणाची उत्तरे देतात.
चुकीचे आणि नियमबाह्य रजिस्ट्री करून देण्यास आणि करण्यास लोक या अधिकाऱ्यांच ऐकतात आणि अधिकारीही लोकांच ऐकतात. कारण दलालामार्फत योग्य ती माया देण्याघेण्याचे व्यवहार ठरलेले असतात. त्यावेळी मात्र लोक अधिकार्यांच ऐकत असतात. विशेष म्हणजे जिल्हा निबंधक माईनकर यांच्या कार्यालया समोरच सह दुय्यम निबंधक यांचे कार्यालय आहे. माईनकर यांच्या कार्यालयातील खिडकीतूनही ही गर्दी दिसू शकते. मात्र माईनकर केवळ *माया* गोळा करण्याची शिस्त लावण्यात मग्न झालेले असल्यामुळे पाकीटा पुढे त्यांना कोरोना पसरणे महत्त्वाचे वाटत नाही. असा टोला लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी मारला आहे. माईनकरांच्या कार्यालयातूनच वादाच्या भोवऱ्यात असलेल्या ज्याला ज्यादा स्टॅम्प ड्युटी लागणार असते, अशा खरेदीखताची बोलणी देशपांडे यांच्या टेबलवर होतात !!! आणि मग त्यातून देशपांडे तोडगा काढत असतात. कारण दलालामार्फत त्यांना मिळालेला असतो रोडगा...
माईनकर यांच्या कार्यालयात उदगीर येथे दुय्यम निबंधक असताना निलंबित झालेला तो महान अधिकारी सध्या कार्यरत आहे, तो कोण ? निलंबित दुय्यम निबंधकाला जिल्ह्याच्या ठिकाणी सह जिल्हा निबंधक पदावर आणून बसवुन दलाली गोळा करायला लावणारा तो अधिकारी कोण ? जिल्हा निबंधकाचे हप्ते गोळा करण्या साठी आणून बसवलेला सह जिल्हा निबंधक दिनांक १ ते १० या कालावधीमध्ये गोळा करतो माया... माईनकर साहेब जरा याचा खुलासा करतील काय ? अशी मागणीही पनाळे यांनी केली आहे.
आणि कोरोना रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयांना योग्य ती काळजी घेण्यासाठी, पाकिटे घेण्याचीच सवय लागलेले माईनकर आणि देशपांडे एखादे आदेशाचे पाकिट पाठवून कोरोना रोखण्यासंदर्भात काही कार्यवाहीचे आदेश देतील काय ?
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.