कीर्ती ऑइल मिल व
रेसिडेन्सी क्लबला ठोकले सील
लातूर/प्रतिनिधी: शहरातील नागरिक आणि विविध व्यावसायिकांकडे असणारी थकबाकी वसूल करण्याच्या मोहिमेला महापालिकेने गती दिली आहे.मोठ्या प्रमाणात थकबाकी असणाऱ्या व्यावसायिक व नागरिकांच्या मालमत्ता सील केल्या जात असून अशाच एका कारवाईत मंगळवारी(दि.२ मार्च) कीर्ती ऑइल मिल व रेसिडेन्सी क्लब या दोन मालमत्तांना पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सील ठोकले.
लातूर महानगरपालिका आर्थिक अडचणीत आहे.कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच पथदिवे व पाणीपुरवठा योजनांचे वीजबिल भरण्यासही पालिकेला अडचणी येत आहेत.काही दिवसांपूर्वीच वीजबिल थकल्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता.पालिकेने ६० लाख रुपये भरून तो पूर्ववत करून घेतला आहे.अशा स्थितीतही शहरातील नागरिकांकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे.पालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आयुक्त अमन मित्तल यांनी पुढाकार घेतला असून सक्तीने वसुली करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.विविध सवलती देऊनही कर भरणा वाढत नसल्यामुळे आयुक्तांनी प्रसंगी मालमत्ता सील करण्याचेही आदेश दिले आहेत.
शहरातील नामांकित असणाऱ्या कीर्ती ऑइल मिल कडे २ कोटी १ लाख ५३ हजार ३८९ रुपये तर एमआयडीसी परिसरात असणाऱ्या रेसिडेन्सी क्लब कडे १८ लाख ४३ हजार ५९६ रुपये मालमत्ता कर थकलेला होता.या दोन्ही मालमत्तांना महापालिकेकडून मंगळवारी सील ठोकण्यात आले. सहाय्यक आयुक्त सुंदर बोंदर,श्रीमती वसुधा फड,श्रीमती शैला डाके,
क्षेत्रीय अधिकारी समाधान सुर्यवंशी,संजय कुलकर्णी यांच्यासह वसुली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
शहरातील नागरिक आणि व्यावसायिकांनी आपल्याकडे असणारा मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकबाकीचा तातडीने पालिकेकडे भरणा करावा अन्यथा मालमत्ता सील करण्याची कारवाई केली जाईल,असा इशारा महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.