स्वामी दयानंद विद्यालयात विज्ञान प्रदर्शन घेवून विज्ञान दिन साजरा
लातूर दि.02/03/2021
जेएसपीएम लातूरद्वारा संचलित स्वामी दयानंद विद्यालय कव्हा येथे विज्ञान प्रदर्शन घेवून सी.व्ही.रमन यांची जयंती विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात आली. यावेळी विज्ञान शिक्षक देशमुख व मुख्याध्यापिका अरूणा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोव्हिड-19 चे नियम पाळून विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले. असा विधायक उपक्रम राबवून सी.व्हि.रमन यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी घेण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनात इयत्ता 5 वी 10 वीच्या विद्यार्थ्यांनी सोशल डिस्टसिंगचे पालन करून तसेच सॅनिटायझरचा वापर करून विज्ञान प्रदर्शनात सक्रिय सहभाग नोंदविला. यावेळी या विज्ञान प्रदर्शनाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका अरूणा कांदे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून विज्ञान शिक्षक देशमुख, कदम, मानकरी, धामणगावे, मोकाशे, अक्कलदिवे, थंबा, मस्के, घार आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
------------------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.