पालकमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त औसा तालुक्यात ४४३ जणांचे विक्रमी रक्तदान

 पालकमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त औसा तालुक्यात ४४३ जणांचे विक्रमी रक्तदान !





औसा (प्रतिनिधी) राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालक मंत्री अमित विलासरावजी देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक २१ मार्च २०२१ रोजी औसा औशात २४३ रक्तदात्यांनी उस्फूर्तपणे विक्रमी संख्येने रक्तदान केले. तसेच येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी फळे वाटप करून आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस साजरा केला. लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने उन्हाळ्यात रुग्णांना रक्त पुरवठा करता यावा म्हणून जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याचा संकल्प केला होता. त्यामुळे लामजना, बेलकुंड, हासेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व औसा येथे सनशाइन इंग्लिश स्कूल मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लातूर ब्लड बँकेचा स्टाफ यांनी रक्तदात्यासाठी व्यवस्था केली होती. प्रारंभी लातूर जिल्ह्याचे सुपुत्र लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या प्रतिमेस काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, तालुका अध्यक्ष दत्तोपंत सूर्यवंशी, शहराध्यक्ष शेख शकील, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष हणमंत राचट्टे, बाबासाहेब गायकवाड, रामदास चव्हाण, मारुती महाराज साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन शाम भोसले, माजी पंचायत समिती सभापती सदाशिव कदम, बाजार समितीचे मुख्य प्रशासक राजेंद्र भोसले आदी मान्यवरांनी लोकनेत्याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. औसा तालुक्यात ४४३ रक्तदात्यांनी उस्फूर्तपणे रक्तदान करून आपल्या नेत्या प्रति आदरयुक्त भावना प्रकट केली. औसा येथे सनशाइन इंग्लिश स्कूल येथील भव्य रक्तदान शिबिराचे उत्कृष्ट आयोजन करण्यासाठी प्रा.सुधीर पोतदार,चांद पटेल,आदमखाँ पठाण,हामिद सय्यद, खुंमिर मुल्ला, बजरंग बाजूळगे, गुलाब शेख,गिरीश उटगे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशील होते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू असल्यामुळे शिबिराच्या ठिकाणी आरोग्य सेतू ॲप नियमाचे काटेकोरपणे पालन करण्यात आले होते. रक्तदात्यासाठी लातूर ब्लड बँकेचे अमोल आगाव, नयन पाटील, पूजा मुंडे, मनीषा गुळवे, अवधूत खंदाडे, यांच्यासह ब्लड बँकेच्या कर्मचाऱ्यांनी रक्तदात्यांना रक्तदानासाठी सुविधा उपलब्ध करून दिली. याप्रसंगी बाजार समितीचे उपसभापती किशोर जाधव, सचिन दाताळ, बाजार समितीचे सचिव मुस्ताक शेख, मुजम्मिल शेख, शहानवाज पटेल, सुलतान शेख, सय्यद खादर, मंजुषा  कसबे,अंगद कांबळे, वहीद कुरेशी,यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते रक्तदात्यांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रयत्नशील होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या