जिल्हा उपनिबंधकांच्या बैठकीत सकारात्मक निर्णय; शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला यश
लातूर/ प्रतिनिधी: बाजार समित्यांच्या माध्यमातून होणारी शेतकरी शेतकऱ्यांची लूट थांबवावी यासाठी शेतकरी संघटनेने अनेक दिवस केलेल्या आंदोलनाला अखेर यश प्राप्त झाले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटनेच्या प्रतिनिधींसमवेत जिल्हा उपनिबंधकांनी घेतलेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाले असून यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
बाजार समित्यांमध्ये होणारी शेतकऱ्यांची लूट व गैरप्रकार थांबवावेत,बाजार समिती कायद्यांची अंमलबजावणी केली जावी यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेने अनेकवेळा आंदोलने केली होती. मागील दोन वर्षांपासून संघटनेने हा विषय लावून धरला होता डिसेंबर महिन्यात संघटनेच्या वतीने पुणे येथे पणान संचालक कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते यावेळी पणन संचालकांनी शेतकरी संघटनेने मांडलेले प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांना पत्र दिले होते त्यानंतर आता
या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संघटनेच्यावतीने जिल्हा उपनिबंधक कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशाराही देण्यात आला होता.त्यानंतर जिल्हा उपनिबंधकांनी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मदन सोमवंशी यांना जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, प्रशासक व सचिवांसमवेत बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते.
जिल्हा उपनिबंधकांच्या कार्यालयात ही बैठक पार पडली.लातूर बाजार समितीमध्ये किमान एका ओळीमध्ये लिलाव घ्यावा. जिल्ह्यातील इतर बाजार समित्यात प्रत्येक दुकानात लिलाव घ्यावा. शेतकऱ्यांच्या मालाची चाळणी केल्यानंतर त्यांच्याकडून कडता घेऊ नये.लिलाव व पोटलीतील मालाच्या भावामध्ये १०० रुपयांपेक्षा अधिक फरक असू नये.मालाच्या प्रतीनुसार भाव मिळण्याची खात्री बाजार समिती सचिवांनी करावी.सॅम्पलसाठी घेतलेल्या शेतमालाचे वजन करून एकूण शेतमालामध्ये ते गृहीत धरले जावे,आदी निर्णय या बैठकीत घेण्यात आले.
या बैठकीस शेतकरी
संघटनेचे जिल्हाध्यक्ष मदन सोमवंशी,प्रतिनिधी हरिश्चंद्र सलगरे,दगडुसाहेब माने,सुनिल कळसे,आर.जी. भुतडा,शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके, माधवराव कंदे,कालिदास भंडे,समाधान क्षिरसागर, बालाजी भंडे,भगवानराव जाधव, शिवाजी बिरादार,
एस.एस.कुलकर्णी,लातूर बाजार समितीचे सचिव बी.डी.दुधाटे,प्रभारी सहाय्यक सचिव सतिष भोसले,उदगीर बाजार समितीचे वरिष्ठ लिपिक दगडूसाहेब माने,देवणी बाजार समितीचे सचिव सुनिल कळसे,अहमदपूर बाजार समितीचे आर.
जी.भुतडा,औसा बाजार समितीचे ,मुश्ताक अहमद शेख यांच्यासह बाजार समित्यांचे सभापती,सचिव,
शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.
काही बाजार समित्यांचे प्रतिनिधी या बैठकीस अनुपस्थित होते.
त्यांच्यासमवेत दि.३१ मार्च रोजी बैठक घेण्याच्या सुचना जिल्हा उपनिबंधकांनी यावेळी दिल्या.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.