महानगरपालिका क्षेत्रात १४ ठिकाणी लसीकरणाची सुविधा उपलब्ध
शहराच्या पूर्व भागातही आता नवीन लसीकरण केंद्र
शहराच्या पूर्व भागातही आता नवीन लसीकरण केंद्र
लातूर/प्रतिनिधी: लातूर शहर महानगरपालिका क्षेत्रात १४ ठिकाणी कोविड लसीकरणाची सुविधा उपलब्ध आहे.यात मनपाच्या ४ लसीकरण केंद्रांसोबतच शहरातील १० खाजगी रुग्णालयांचाही समावेश असून नागरिकांनी स्वतःचे लसीकरण करून घ्यावे,असे आवाहन महानगर पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पात्र लाभार्थ्यांसाठी शहरात एकूण १४ लसीकरण केंद्र उपलब्ध आहेत.यामध्ये विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल,
मनपा रुग्णालय,पटेल चौक याठिकाणी लसीकरण केले जात आहे.शहराच्या पूर्व भागातील नागरिकांसाठी मनपाच्या वतीने विवेकानंद चौकातील राजीवनगर नागरी आरोग्य केंद्रातही आता लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.या सर्व केंद्रांवर मोफत लसीकरणाची सुविधा उपलब्ध आहे.याशिवाय शहरातील १० खाजगी रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू आहे.खाजगी रुग्णालयांमध्ये सशुल्क लसीकरण केले जात आहे. शहरातील गायत्री हॉस्पिटल,विवेकानंद रुग्णालय,देशपांडे हॉस्पिटल, अल्फा हॉस्पिटल,येलाले हॉस्पिटल,कृष्णा हॉस्पिटल,लातूर कॅन्सर हॉस्पिटल,सदासुख हॉस्पिटल ही १० खाजगी रुग्णालये असे एकूण १४ ठिकाणी लसीकरणाची सुविधा उपलब्ध आहे.
मनपा क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या नजीकच्या व सोयीच्या ठिकाणी जाऊन लसीकरण करून घ्यावे,असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
--
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.