बाजार समित्यांमधील लूट थांबविण्यासंदर्भात जिल्हा उपनिबंधकांनी बोलावली बैठक
लातूर/प्रतिनिधी: बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांची वारंवार होणारी लूट थांबविण्यासंदर्भात शेतकरी संघटनेने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून यासंदर्भात जिल्हा उपनिबंधकांनी सोमवार दि.२३मार्च रोजी बैठक बोलावली आहे.
लातूरसह जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती व प्रशासकांना या बैठकीस उपस्थित राहण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये अनेक गैरप्रकार होत आहेत.वेगवेगळ्या मार्गांनी शेतकऱ्यांची लूट सुरू आहे.कडता,सॅम्पल, पोटली,पायलीच्या नावाखाली शेतकऱ्यांना लुबाडले जात आहे.याशिवाय एकाही बाजार समितीत कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्याची अमलबजावणी केली जात नाही.यामुळे शेतकरी चोहोबाजूंनी संकटात सापडला आहे.
हा प्रश्न निकाली काढावा यासाठी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांनी पणन संचालक तसेच जिल्हाध्यक्ष मदन सोमवंशी यांनीही अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने दिली पण त्याचा उपयोग झाला नाही.यामुळे मदन सोमवंशी यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयासच टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता.या इशाऱ्यानंतर मात्र अधिकाऱ्यांना जाग आली आहे.त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी तसेच शेतकऱ्यांची होणारी लूट थांबविण्यासंदर्भात सोमवार दि.२३मार्च रोजी जिल्हा उपनिबंधकांनी बैठक बोलावली आहे.जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांच्या सभापती व प्रशासकांना या बैठकीस उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.या बैठकीत काहीतरी तोडगा निघेल आणि शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी प्रयत्न केले जातील,असा आशावाद शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मदन सोमवंशी,युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके,जेष्ठ नेते,शिवाजी पाटील नदीवाडीकर,प्रदेश कार्यकारिणी सदस्य माधवराव मल्लेशे,माजी जिल्हाध्यक्ष माधवराव कंदे,हरिश्चंद्र सलगरे,बाबाराव पाटील,कालिदास भंडे,केशव धनाडे,किसनराव शिंदे,
अण्णाराव चव्हाण,
इब्राहिम शेख,शंकर निला ,अपराजित भिंगोले,बालाजी जाधव,किशोर महाराज शिवणीकर,दत्ता गुंजोटे,गुंडेराव उमाटे,वसंत कंदगुळे,करण भोसले , समाधान क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.