संचारबंदीच्या काळात जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना बँकेत व्यवहार करण्यासाठी परवानगी

 संचारबंदीच्या काळात जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना


बँकेत व्यवहार करण्यासाठी परवानगी



  


हिंगोली, (शेख इमामोद्दीन ) दि. 03 : राज्यात तसेच जिल्ह्यात कोव्हीड-19 बाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात 7  दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या दरम्यान जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना बँकेत व्यवहार करण्यासाठी परवानगी मिळण्याबाबत विनंती करण्यात आली होती. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, हिंगोली यांनी संचारबंदीच्या काळात जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना बँकेत व्यवहार करण्यासाठी परवानगी दिली आहे.


या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक तसेच जिल्ह्यातील सर्व बँकांचे व्यवस्थापक यांची असेल. सदरआदेशाची आवज्ञा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येईल व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग प्रतिबंध कायदा 1897, महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 अंतर्गत संबंधितावर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.


 


****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या