विक्रमी २५५३ रक्तदान पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त

 

विक्रमी २५५३ रक्तदान

पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त

जिल्हा काँग्रेसचा पुढाकार, उद्दिष्ट २१०० झाले २५५३

विकासाभिमुख नेत्यावर लातूरकरांनी दाखवला विश्वास






लातूर प्रतिनिधी : २३ मार्च :


युसूफ सय्यद प्रतिनिधी
















   राज्याचे वैदयकीय शिक्षण मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर जिल्ह्यातील १० तालुक्यात रक्तदान शिबीर घेण्यात आले, यासाठी जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते याना २१०० बँग रक्तदान व्हावे असे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवले होते. मात्र  लोकनेते विलासराव देशमुख, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या विकासभिमुख कार्य पद्धतीने जोडलेल्या काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उस्फूर्तपणे तब्बल २५५३ जणांनी रक्तदान करून पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्यावर विश्वास व्यक्त करून विकासात्मक कार्यकरणाऱ्या नेत्यासोबत आम्हीं लातूरकर आहोत असा संदेश रक्तदान करून रक्तदात्यानी दिला आहे. उद्दिष्ट २१०० होते मात्र लोकनेत्यावर प्रेम विश्वास व्यक्त करून तब्बल २५५३ जणांनी उस्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे,  यामुळे रक्तदान करणारा  लातूर पॅटर्न निर्माण केला आहे

   लातूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांच्या माध्यमातून ही संकल्पना जिल्हाभरात राबवली गेली गेली. गेल्या दहा दिवसापासून जिल्हाभरात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, विवीध सेलचे जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, पदाधिकारी स्थानीक पातळीवरील कार्यकर्ते यांनी बैठका घेऊन रक्तदानाचे महत्व सांगीतले. सध्या कोवीड१९ ची सूरू असलेली साथ रक्ताचा तुटवडा जाणवू नये यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी केली होती. त्याला जिल्यातील काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकनेते विलासराव देशमुख साहेब, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या चळवळीतील कार्यकर्ते विवीध संस्थांचे पदाधिकारी यांनी खूप सहकार्य केले आहे त्यामूळे उद्दिष्ट २१०० ठेवले होते मात्र पालकमंत्री अमित देशमुख यांच्यावर विश्वास व्यक्त करीत तब्बल उद्दीष्टापेक्षा ५५३ जास्त म्हणजे २५५३ जणांनी उस्फूर्तपणे रक्तदान केले आहे, अशी माहिती लातूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांनी दिली आहे.

जिल्यातील तालुका व्हाईज रक्तदान खालील प्रमाणे झाले असून औसा तालुका ५१०, औसा शहर २२१, लामजना ५१, बेलकुंड १५१, हसेगाव ३६, मदणसुरी ५१, यांचा समावेश आहे. चाकुर तालुक्यात ४७० त्यात चाकुर शहर १५६, नळेगाव १११, चापोली ६५, वडवळ ५५, रोहीना ४३, जाणवळ ४० रक्तदात्याचा समावेश आहे. उदगीर तालुक्यात ३०९ जणांनी रक्तदान केले असून त्यात उदगीर शहर १२२, हळी ११३, हेर ७४, तर रेणापूर तालुका २९६ जणांनी उस्फूर्तपणे रक्तदान केले आहे त्यात रेणापूर शहर ५३, पोहरेगाव ६६, पानगाव ५५, खरोळा ४१, लखमापूर ६१, बिटरगाव २०, निलंगा तालुका २५१ रक्तदानात सहभाग नोंदवला असून त्यात निलंगा शहर ५२, आंबुलगा ५०, औराद ४७, राठोडा १०२, लातूर तालुक्यात २२१ जणांनी रक्तदान केले त्यात गंगापूर ५६, तांदुळजा ३४, बाभळगाव ३३, मुरुड २५, आर्वी २५, भातांगली२१, जवळा (बु) २१, निवळी ६, देवणी तालुक्यात १९१ जणांनी रक्तदान केले आहे त्यात देवणी शहर १०४ तर वलांडी ८७, शिरूर अनंतपाळ तालुक्यांत ११९ जणांनी रक्तदान केले त्यात साकोळ ५१, बोळे गाव ३१, उजेड २२, शीवपुर १५, अहमदपूर तालुक्यात ११६ जणांनी उस्फूर्तपणे रक्तदान केले त्यात अहमदपूर शहरात ९८, तर येलादेवी उमरगा येथे १८, तर जळकोट मध्ये ७० जणांनी उस्फूर्तपणे रक्तदान करून तब्बल एकूण जील्यात २५५३ असे विक्रमी रक्तदान केले आहे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करून  जिल्ह्यांत नेत्यावर लातूरकरांनी मोठा विश्वास प्रेम व्यक्त केले आहे

  रक्तदान शिबिर घेण्यासाठी माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्यातील सर्वच काँग्रेस विवीध फ्रंटचे अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी खूप मेहनत घेतली. त्यामूळे उद्दिष्ट पेक्षा जास्त रक्तदान झाले आहे. त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करीत आहेत, अशी माहिती जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांनी बोलताना दिली आहे

-----------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या