औसा तालुक्यातील बेलकुंड येथे सरपंच व उपसरपंचाचे ग्रामपंचायत कार्यालया समोर आमरण उपोषण
औसा मुख्तार मणियार
औसा तालुक्यातील बेलकुंड येथील ग्रामपंचायत हद्दीतील हॉटेल सिंहगड बार अॅण्ड रेस्टारंटची परवानगी राज्य उत्पादन शुल्क विभागाने बेकायदेशीररित्या दिली.ती रद्द करावी.यासाठी बेलकुंड ग्रामपंचायत कार्यालयासमोर दि.२२ मार्च २०२१ सोमवार पासून बेलकुंडचे सरपंच विष्णु कोळी व उपसरपंच सचीन पवार यांनी बेलकुंड येथे ग्रामपंचायत कार्यालयसमोर आमरण उपोषणला बसले आहेत. त्यांचा आज दुसरा दिवस आहे.त्यांचीअशी मागणी आहे बेलकुंड येथील हद्दीतील सपूर्ण दारू बंदी झाली पाहिजे तसेच हाटेल सिंहगड बार & रेस्टारंटची परवानगी राज्य उत्पादन शुल्क विभागाने बेकायदेशीररित्या दिली आहे.ती रद्द करावी. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे. बनावट परवाना कागदपत्रे द्वारा दिलेला परवाना बेकायदेशीर असल्याचा आरोप बेलकुड सरपंच विष्णु कोळी व उपसरपंच सचिन पवार यांनी केला आहे. जिल्हाअधिकारी व राज्य उत्पादन शुल्क व औसा तहसीलदार याना निवेदन देऊन सुद्धा कुठलीच कारवाई झाली नाही.असा आरोप सुध्दा सरपंच विष्णु कोळी यांनी केला आहे. व दिलेला परवाना रद्द करण्यात यावा हीच आमची रास्त मागणी आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.