शहरातील प्रत्येक गल्ली व वार्डात वाढत आहे अतिक्रमण
एम आय एम पक्षाच्या वतीने औसा नगरपालिकेला विविध मागण्यांचे निवेदन सादर
औसा मुख्तार मणियार
औसा शहरातील नगरपालिकेच्या आरक्षित जागेवर बांधकाम करून नगर पालिकेच्या औसा शहरातील प्रत्येक ठिकाणी अतिक्रमण करून रस्ते अरुंद केलेबाबत तिसरा टप्पा जामा मस्जिद ते लातूर वेस हनुमान मंदिर रस्ता पूर्ण करण्यासाठी व नगरपालिका सभागृह येथे सुशोभीकरण करावे व औसा शहरातील जुना रिंग रोड बस स्टॅन्ड ते खादी भांडार मार्गे भुसावेस ते कटकर गल्ली, कटर गल्ली ते किल्ला मैदान ते निलंगा वेस रस्ता करणे, ऐतिहासिक असलेली निलंगा वेस याची डागडुजी करावी. या मागणीसाठी एम आय एम पक्षाच्या वतीने नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.
या निवेदनात मागील काही वर्षापासून नगरपालिकेला वारंवार निदर्शनास आणून देऊन नगरपालिका याकडे दुर्लक्ष करीत आहे. औसा शहरातील प्रत्येक गल्ली व वार्डात अतिक्रमण मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. विशेषतः नगरपालिके कडे जाणाऱ्या कैकाडी गल्ली येथे घरकुल योजना अंतर्गत मोठ्या प्रमाणात बांधकाम करण्यात आले आहे बांधकाम सुरू असताना वारंवार आपणास दूरध्वनीवरून कल्पना देऊनही आपण विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संगणमताने शहरातील लाईट च्या तारा बदलाबद्दल करून बांधकाम करण्यात आले.
शौचालयाच्या नावाखाली गटारी व त्याच्या नावाखाली लाभार्थ्यांना त्याचा लाभ ही घेतला परंतु, नगरपालिकेला त्यावेळेस तक्रारी करून सुद्धा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले .व त्यामुळे अतिक्रमण वाढले. शासनाच्या योजनेची पायमल्ली होत आहे. तसेच मुख्य रस्ता किल्ला मैदान आठवडी बाजाराच्या जागेत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. ब-याच ठिकाणी भाजी मार्केट, कोंडवाडा अग्निशामक साठी आरक्षित केलेली जागा या नावाने आरक्षित आहे त्या जागेचा गैरवापर होत आहे.शहराच्या मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूने व्यवसायिकांनी अतिक्रमण करून नगरपालिकेच्या फुटपाथवर अतिक्रमण झाल्यामुळे मुख्य रस्त्यावर ये-जा करणार्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
मुख्य रस्त्यावरील महाराष्ट्र बँक, आय डी बी आय बँक, स्टेट बँक, लातूर जिल्हा बँकेचीे पार्किंग ची जागा उपलब्ध नसल्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. तसेच लातूर वेस, हनुमान मंदिर, भादा रस्ता ते भुसार वेस ते दुध डेअरी कटगर गल्ली,ते किल्ला मैदान ते निलंगा वेस ते तहसील कार्यालय औसा जुना रिंग रोड असलेला त्वरित रुंद करून काम करण्यात यावे ऐतिहासिक असलेले औशातील निलंगा वेस, भुसार वेस, ब्राह्मण गल्लीतील वेसची डागडुजी करण्यात यावी.
औसा नगरपालिकेच्या वतीने जनतेच्या सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी सभागृह उभारणी करण्यात आली तो अल्पदरात गोरगरिबांसाठी उपलब्ध होते. कोणाच्या काळात त्या ठिकाणी समारंभ झाले नसल्याने शासनाच्या नियमांचा उल्लंघन होऊ नये म्हणून घेण्यात आले नाही त्या पालिकेच्या उत्पन्नात घट झाली. नगरपालिकेच्या सांस्कृतिक सभागृह एक वर्षापासून बंद असल्यामुळे दयनीय अवस्था झाली आहे. तरी औसा शहरातील नागरिकाच्या लग्न सोहळा कार्यक्रमासाठी उपलब्ध असलेला सभागृह यांचे डागडुजी, रंगरंगोटी करून व दुरुस्ती करून व त्या ठिकाणी शौचालय बांधून पाणी व लाईटची दुरूस्ती करून शहरातील जनतेची आर्थिक लूट थांबवावी.अशी मागणी एम आय एम पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय लातूर व औसा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.वरील मागण्या एक आठवड्याच्या आत पूर्ण न केल्यास नगर विकास मंत्री महाराष्ट्र राज्य व जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून देण्यात येईल असा इशारा एम आय एम पक्षाचे नेते अॅड गफुरूल्ला हाशमी व एम आय एम चे औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी केले आहे.या निवेदनावर यांची स्वाक्षरी आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.