प्रकल्पाच्या जागेतील अनधिकृत हॉटेल अनेक्स ची जागा ताब्यात घ्या.:- डॉ. राजन माकणीकर*

 *प्रकल्पाच्या जागेतील अनधिकृत हॉटेल अनेक्स ची जागा ताब्यात घ्या.:- डॉ. राजन माकणीकर*






*मुंबई दि (प्रतिनिधी) झोपडपट्टी सुधार योजने अंतर्गत होऊ घातलेल्या शासनाच्या प्रकल्पातील मूलभूत सुविधांची जागा विकासकाने हॉटेल अनेक्स च्या नावाने गिळंकृत करत असून तात्काळ हॉटेल बंद करून जागा ताब्यात घ्यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी केली आहे.*


रोड क्रमांक ७ वर आकृती ट्रेंड सेंटर च्या लगत आकृती अनेक्स या एस.आर.ये च्या इमारती मध्ये 2 मजल्यावर हॉटेल अनेक्स एक्सिक्युटिव्ह नावाचे सर्व सुविधायुक्त व्यावसायिक हॉटेलची निर्मिती केली असून ती बेकायदेशीर पद्धतीने उभारली गेली आहे.


सदर इमारती मधील जी जागा झोपडपट्टी वासीयांच्या मूलभूत गरजा पुरविण्यासाठी म्हणजेच, बालवाडी, सोशल वेल्फेअर सेंटर, समाज मंदिर निर्मिती साठी आहे, मात्र तत्कालीन भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून विकासक विमल शहा व महादलाल मुरजी पटेल यांनी ही जागा गडप करण्याच्या हेतूने हॉटेल बांधले आहे.


प्रकल्पातील जागेची चोरी करून शासन व प्रशासनाला फसवून दिशाभूल करून येथे अनेक्स नावाचे हॉटेल बांधून भाड्याने चालवले जात आहे. कायद्याच्या राज्यात हुकूमशाही चालू असून हा दांडेलशाही प्रकार थाम्बवून मूळ प्रकल्पग्रस्थना सोबत घेऊन नियमाप्रमाणे कारभार अशी मागणी पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर आणि राज्य महासचिव कॅप्टन श्रावण गायकवाड यांनी केली आहे.


पक्षाच्या वतीने प्रकल्पातील चोरी भ्रष्टाचार उघडकीस आणण्यास तीव्र आंदोलन उभारले असून विकासक विमल शहा व पडद्यामागील पण खरा सूत्रधार महादलाल मुरजी पटेल यांचेवर चोरी व फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा आणि अनेक्स हॉटेल ची जागा एमआयडीसी ने ताब्यात घेऊन नियमाप्रमाणे प्रकल्पासाठी वापर करावा अश्या आशयाचे पत्र उद्योगसारथी मुख्य कार्यकारी अधिकारी व वरिष्ठ पोलीस निरीक्षक एमआयडीसी पोलीस ठाणे यांना दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या