कोरोनाला रोखण्यासाठी जनतेनी काळजी घ्यावी
--- विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर
हिंगोली, दि. 05 (जिला प्रतिनिधी शेख इमामोद्दीन ) : कोरोनाच्या प्रादुर्भावाची सुरुवात झाल्यापासून हिंगोली जिल्ह्याने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत खूप चांगले काम केले असून हिंगोलीकरांनी देखील प्रशासनास खूप सहकार्य केले. परंतु सध्या कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेनी स्वत:ची व इतरांची काळजी घेण्याचे आवाहन विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी आज येथे केले.
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयास विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी धनवंत माळी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी रुग्णालयाच्या कामकाजाची पाहणी केली व व्हेंटीलेटरवर असलेल्या रुग्णांशी चर्चा करुन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांना योग्य प्रकारे आरोग्य सुविधा मिळत असल्याने समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी हिंगोली येथील सुशोभिकरण करण्यात आलेल्या रामलीला मैदानाची विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी भेट देऊन पहाणी केली. मैदानाचे सपाटीकरण, चोहोबाजूने वृक्ष लागवड व इतर कामकाज पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयास भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.
*****
8 ते 26 मार्च या कालावधीत
फिरते लोकन्यायालयाचे आयोजन
हिंगोली, (जिमाका) दि. 05 : मा. उच्च न्यायालय विधी देखरेख उपसमिती औरंगाबाद यांच्या निर्देशानुसार परभणी न्यायिक जिल्ह्यामध्ये दिनांक 8 मार्च ते 26 मार्च , 2021 या कालावधीमध्ये फिरते लेाकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे.
त्या अनुषंगाने दिनांक 8 मार्च रोजी सकाळी 11.00 वाजता फिरते लोकन्यायालय व शिबीरांच्या वाहनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम जिल्हा न्यायालय परिसर, परभणी येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
दि. 8 मार्च, 2021 रोजी 5.30 वाजता वसमत तालुक्यातील पारडी खु., दि.9 मार्च, 2021 रोजी सकाळी 8.30 वाजता वसमत तालुक्यातील पारडी बागल, सकाळी 10.30 वाजता वसमत तालुक्यातील गिरगांव, सायंकाळी 5.30 वाजता औंढा तालुक्यातील नागेशवाडी, दि.10 मार्च, 2021 रोजी सकाळी 8.30 वाजता औंढा तालुक्यातील राजापूर, 10.30 वाजता औंढा तालुक्यातील पिंपळदरी येथे फिरते लोकन्यायालय व शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक 12 मार्च, 2021 रोजी सकाळी 8.30 वाजता कळमनुरी तालुक्यातील जांभरुन, सकाळी 10.30 वाजता कळमनुरी तालुक्यातील उमरा, सायंकाळी 5.30 वाजता हिंगोली तालुक्यातील सवड येथे फिरते लोकन्यायालय व शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक 15 मार्च, 2021 रोजी सकाळी 8.30 वाजता हिंगोली तालुक्यातील घोटा, 10.30 वाजता हिंगोली तालुक्यातील नरसी. दि.16 मार्च, 2021 रोजी सकाळी 8.30 वाजता सेनगाव तालुक्यातील भंडारी, सकाळी 10.30 वाजता सेनगाव तालुक्यातील वटकळी येथे फिरते लोकन्यायालय व शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एफ . के. शेख यांनी दिली आहे.
********
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.