विनामास्क फिरणाऱ्या नागरीकांवर दंडात्मक कारवाई सोबत लातूर मनपाकडून मोफत मास्क लातूरकरांच्या सूचनेनंतर पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी दिले होते मनपा प्रशासनाला निर्देश

 

विनामास्क फिरणाऱ्या नागरीकांवर दंडात्मक कारवाई सोबत

लातूर मनपाकडून मोफत मास्क

लातूरकरांच्या सूचनेनंतर पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख

यांनी दिले होते मनपा प्रशासनाला निर्देश









 

  कोविड १९ प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर लातूर शहरात विना मास्क फिरणाऱ्या नागरीकावर मनपा कडून दंडात्मक कारवाई करण्यासोबतच संबंधितास आता मोफत मास्कचे वाटप देखील सुरु करण्यात आले आहे. या संदर्भात प्रबुद्ध नगर लातूर येथील विकास सूर्यवंशी यांनी पालकमंत्री ना.अमित विलासराव देशमुख यांना समाजमाध्यमातून दंड केल्या नंतर संबंधितास मास्क देण्यात यावा अशी सूचना केली होती, ही सकारात्मक सुचना लक्षात घेऊन लातूर मनपाने विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई सोबत संबंधित नागरिकास मोफत मास्कचे वाटप करावे अशा प्रकारचे निर्देश लातूर मनपा आयुक्तांना पालकमंत्री ना. देशमुख यांनी दिले होते.

   लातूर शहरात विना मास्क फिरणारे नागरिक, फेरीवाले यांचे वाढते प्रमाण आणि कोविड१९ रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत लातूर मनपा प्रशासनाकडून विना मास्क फिरणाऱ्या नागरिकावर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र दंडात्मक कारवाई नंतर संबंधित व्यक्ती दंड भरून पुन्हा विना मास्क शहरात बिनदिक्कतपने फिरत यावर काही प्रमाणात अंकूश राखला जावा जेणेकरून दंडात्मक कारवाई नंतर संबंधित नागरीक विना मास्क फिरणार नाही याकरिता दंडात्मक कारवाई झालेल्या व्यक्तीला लातूर मनपा प्रशासनाकडून एक मास्क मोफत देण्यात यावा, अशा प्रकारची विनंती वजा सूचना शहरातील प्रबुद्ध नगर भागातील विकास सूर्यवंशी नामक नागरिकाने लातूरचे पालकमंत्री ना. अमित देशमुख यांच्याकडे केली होती.

    यावर सकारात्मक पावले उचलून लातूर शहरात विना मास्क फिरणाऱ्या नागरीकावर दंडात्मक कारवाई करण्यासोबतच संबंधितास लातूर मनपा कडून एक मास्क मोफत दिला जावा, अशा सूचना पालकमंत्री ना.अमित देशमुख यांनी लातूर शहर मनपा आयुक्त अमन मित्तल यांना करीत तात्काळ अमलबजावणी करण्याचे निर्देश दिले .

   यावर लातूर मनपाने कारवाई करीत आता लातूर शहरात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकावर दंडात्मक कारवाई सोबतच मोफत मास्क वाटप करण्यास सुरुवात केली असून या कारवाई बद्दल नागरिकांनी पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्यासह लातूर मनपा आयुक्त व मनपा प्रशासनाचे आभार मानले आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या