सर्वांना हवेहवेसे वाटणारे तालुक्याचे उभरते नेतृत्व म्हणजे श्री शैल्यदादा
हजरजवाबी व्यक्तीमत्व .....मदतीला धावून येणारा नेता
आपला माणूस-श्रीशैल्यदादा
आदरणीय श्री शैल्य दादा यांचा आज वाढदिवस .... आमच्या साठी आहे खास....... या वाढदिवसाच्या दादांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांना सुदृढ व निरोगी आरोग्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना..... श्रीशैल्य उटगे यांना आदराने सर्वजण सर्वजण दादा म्हणतात.
राजकीय आयुष्याच्या वाटचालीत सतत संघर्ष करत स्वतः ची एक आगळी वेगळी ओळख निर्माण करणारे सर्वांना हवेहवेसे वाटणारे तालुक्याचे उभरते नेतृत्व म्हणजे श्री शैल्य दादा होय. हजर जबाबी दिलेला शब्द पाळणारे, मदतीला धावून येणारा आपल्या हक्काचा माणूस अशी ओळख जनसामान्य त निर्माण करून पक्ष श्रेष्ठी वर निष्ठा ठेवून कसल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता सर्वसांमन्याच्या हिताचा विचार करणारे नेत्रत्व म्हणजे श्री शैल्य दादा होय. एखादी संधी हुकली किंवा अपेक्षेपेक्षा कमी भेटलं म्हणून कधीच निराश होऊन न थांबलेलं आणि आयुष्यातील साऱ्या कठीण वादळांना हसतमुखाने आणि संयमाने सामोरे जाणारे अनाकलनीय व्यक्तिमत्व म्हणजे श्रीशैल्य दादा होय.
विकासरत्न विलासरावजी देशमुख साहेब आणि सहकारमहर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या राजकीय तालमीत तयार झालेले दादा सर्व जिल्ह्यात सहकारमहर्षी आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांचे मानसपुत्र म्हणून ओळखले जातात आणि वेळोवेळी त्याची प्रचितीही येते.
आपल्यावर पक्षाने व साहेबांनी दिलेली जबाबदारी ही चोख पार पाडण्यात एक वेगळाच हातकंडा आहे. परिस्थिती अनुकूल असो वा प्रतिकूल असो यात दादांचा हातकंडाच वेगळा असून त्या प्रतिकूल परिस्थिती स ते आपल्या अनुकूल परिस्थिती निर्माण करण्याची त्यांची एक वेगळीच लक्ष आहे.
युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष,तसेच काॅग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ते विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखानाचे सलग दोन वेळा व्हाईस चेअरमन होणे इथपर्यंतचा दादांचा प्रवास हा खूप चढ उतारांचा व खडतर होता. परंतु यशाने हुरळून न जाता आणि अपयशाने खचून न जाता पुढे चालत राहणे हाच दादांचा स्वभाव वैशिष्ट्य आहे.आयुष्यात सातत्याने माणसं जोडत जोडलेल्या माणसाची काळजी घेणे त्यांच्या सुख दुःखात त्यांच्या पाठीमागे खंबीर उभा राहणे या स्वभावामुळे दादाची लोकप्रियता आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस भरमसाठ वाढत असून एकदा जवळ आलेला माणूस तो दुरावणार नाही दुखावणार नाही याची विशेष काळजी घेतात.म्हणून तर आज संबंध तालुक्यातील लोकांच्या मनात एक आगळेवेगळे स्थान निर्माण केले असून तालुक्यांचे उमलते नेतृत्व म्हणून तालुका वाशी त्यांच्या कडे पाहत आहेत.आपल्या परिसरातील आपल्या लोकांचे जगणे दै जीवन सुखकर होण्यासाठी सातत्याने धडपडणारे नेतृत्व म्हणून सुपरिचित असलेल्या दादांनी सामान्यांना पतपुरवठा आणि रोजगार निर्मिती करून खूप कुटुंबाना आधार देण्याचे कार्य केले एवढ्यावरच न थांबता पतसंस्थेचे रूपांतर SOS मल्टिस्टेट मध्ये करून आणखी मोठ्याप्रमाणात पतपुरवठा करून आणि गरजू लोकांच्या कुटुंबाला आधार देऊन शेकडो कुटुंबे जगवली त्याचबरोबर बेरोजगारांना व्यवसाय सुरु करण्यासाठी अत्यंत अल्पव्याजदरात पतपुरवठा करून कित्येक कुटुंब उभे केलीत या कुटुंबाचे आधारवड ठरले आहेत .
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या लेकरांना ऊच्च दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे याउदात्त हेतूने सनसाईन इंग्लिश स्कूल औसा येथे सुरू केले आणि या तालुक्यातील समान्यांच्या पाल्याना लातूरच्या दर्जाच्या शिक्षणाची सुविधा अल्पदरात उपलब्ध करून दिली हे सर्व करत सामाजिक बांधिलकी ही जपली आहे. हे स्वभाव गुण आणि नेत्रत्वाकडून जनसेवेचा घेतलेला वसा लाभलेल्या
दादांना सर्वप्रथम भादा जिल्हापरिषद गटातून साहेबांच्या आशीर्वादाने आणि सहकारमहर्षी दिलीपरावजी देशमुख साहेबांच्या विश्वासामुळे निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आणि जिल्हापरिषद सदस्य म्हणून विक्रमी मताधिक्याने विजयी झाले आणि दादांना जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून पहिली संधी भेटली आणि दादांनी आपल्या कार्याची चुणूक नेत्रत्वाला दाखवली स्वतःच्या मतदारसंघात तर कामाचा सपाटा लावलाच त्याच बरोबर ते कसे दर्जेदार होतील हे ही कटाक्षाने पाळले उपाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात संपूर्ण जिल्हा पिंजून काढून अत्यंत प्रामाणिक आणि गतिमान कामे करण्याची दादांची हातोटी ही जमेची बाजू ठरली हे विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती मार्केट कमिटी साखर कारखाना निवडणुकीत सातत्याने या मतदार संघातून अपवाद वगळता कायम विजयश्री खेचून आणला.उमेदवार कोणीही असो प्रचार दादा करतात म्हणजे ते निवडून येणारच हे समीकरणच याच उत्तम उदाहरण म्हणजे खासदार आवळे साहेब आमदार वैजिनाथ दादा हे निवडून आणण्यात दादांचा सिंहाचा वाटा होता एवढेच काय अगदी मोदी लाटेत ही आमदार त्रंबकनाना भिसे यांनाही फक्त 12 दिवसात विजयी करण्यात मोलाचे योगदान त्याच बरोबर गत जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणुकीत ही स्वतःच्या हक्काची जागा असताना मतदार संघ असतानाही साहेब ठरवतील ते धोरण बांधतील ते तोरण म्हणून कसलाही लोकसंपर्क नसलेले धनंजय देशमुख यांना जी प सदस्य तर दोन्ही पंचायत समिती सदस्य ही पक्षाचेच विजयी करण्यात सिंहाचा वाटा दादांचाच
विकासरत्न विलासरावजी देशमुख यांचा पूर्णाकृती पुतळा आणि स्मृती स्थळाची निर्मितीही नेत्यांच्या मार्गदर्शन आणि खंबीर नेत्रत्वा खाली यशस्वीपणे उभारणी केली आणि जणू साहेब प्रेमींसाठी शेतकऱ्यांचे मंदिर ठरलेल्या मांजरा येथे पंढरीच उभा केली हे स्मृती स्थळ येणाऱ्या कित्येक पिढ्यास प्रेरणादायी असेल यात काही शंका नाही
त्यामुळे आपल्या कर्तुत्वाने जनसामान्यांच्या मनात एक आगळेवेगळे स्थान निर्माण करणारे
सर्वांना हवेहवेसे वाटणारे तालुक्याचे उभरते नेतृत्व
हजरजबाबी व्यक्तीमत्व .....मदतीला धावून येणारा नेता
संवेदनशील सामाजिक बांधिलकी मनमिळाऊ सतत हास्य मुद्रेने सर्वाना सोबत विश्वासात घेऊन कार्य करणाऱ्या दिलदार दिलखुलास व्यक्तिमत्त्व आपल्या सर्वांचे व तालुक्यांचे उभरते नेतृत्व म्हणून ओळख असणाऱ्या दादांचा आज म्हणजे 9 मार्च रोजी वाढदिवस
दादा आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा
उदंड आयुष्यासाठी आई तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना तसेच आपल्या दादांना येणाऱ्या काळात औसा विधानसभेची संधी भेटेल आणि आपल्या मतदार संघाला आपला आमदार दादांच्या रुपात भेटेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो
पुन्हाएकदा लोक कल्याणकारी सर्वांच्या लाडक्या जनसामान्यांच्या आवडत्या नेत्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
𝖂𝖎𝖘𝖍 𝖞𝖔𝖚 𝖒𝖆𝖓𝖞 𝖒𝖆𝖓𝖞 𝖍𝖆𝖕𝖕𝖞 𝖗𝖊𝖙𝖚𝖗𝖓𝖘 𝖔𝖋 𝖙𝖍𝖊 𝖉𝖆𝖞
*पांचाळ विठ्ठल*
*राज्य & मराठवाडा स्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्राप्त*
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.