सामाजिक बांधिलकी माणून रक्तदान करणे हे मानवी जीवनातील सर्वश्रेष्ठ दान आहे ः प्रा.सुदर्शनराव बिरादार
लातूर ः सामाजिक उपक्रम या संघटनेच्यावतीने महाशिवरात्रीनिमित्त ज्ञानदिप कोचिंग क्लासेस सुतमिल कंपाऊंड येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीराच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपाप्रसंगी लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांनी सामाजिक बांधिलकी माणून रक्तदान करणे हे मानवी जीवनातील सर्वश्रेष्ठ दान आहे.
ते पुढे म्हणाले, रक्तदान आज काळाची गरज बनली असून आपल्या जवळच्या नातेवाईकांना रक्ताची गरज भासली अन् रक्तावाचून त्याचे बरेवाईट झाल्यास आपले किती नुकसान होते. तसेच रक्त न मिळाल्यामुळे इतरांचे नुकसान होवू नये हा उद्देश ठेवून रक्तदान चळवळ वाढली पाहिजे. मागे शिवजयंतीला 3600 बाटल्याचे रक्तदान करण्यात आले व शिवजयंती एवढे झालेले रक्तदान हे रक्तदानातील लातूर पॅटर्न बनला. तुकाराम पाटलांनी केलेली सर्व महामानवांच्या जयंत्यांना रक्तदान शिबीरे घ्यावीत या मागणीला प्रा.सुदर्शनराव बिरादार यांनी पाठिंबा दिला. सध्या कोरोनाचा काळ आहे. सुरूवातीच्या काळात कोरोनाची प्रचंड दहशत निर्माण झाली होती. आता लोक कोरोनाला घाबरत नाहीत. मात्र नियमांचे पालन करावे लागेल. कोरोना गेला नाही तो यमदूत बनून आपल्या सोबत हिंडत आहे. यावेळी प्रा.सुदर्शनराव बिरादार म्हणाले रक्तदान करणार्या इमारती रक्तदान होत आहे. हे फार मोठे काम होत आहे. लातूरच्या क्लासेसचे वाढलेल्या नावलौकीकामागे क्लासेस संचालकांची फार मोठी मेहनत असून त्यांनी प्रचंड हालअपेष्टा सहन करून प्रतिकुल परिस्थितीत विजय मिळवला आहे. शासनाने खरं तर क्लासेसवाल्यांचा विशेष गौरव केला पाहिजे.
यावेळी माजी महापौर स्मिा खानापूरे, तुकाराम पाटील आदिंची भाषणे झाली. यावेळी 38 बाटल्या रक्तदान करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पवन भोसले, मनोज पोतदार, खंडू सावंत, सोमनाथ सावंत, नागेश जवळे, जाधव भासेले, ढगे सर, बिडवे, सर, सुरेश आटोळकर, डॉ.योगेश गावसाने-रक्त संक्रमण अधिकारी, दिगंबर पवार-जनसंपर्क अधिकारी, किशोर पवार, सौ.रेखा गवळी, अरूण कासले, संजय ठाकुर, अन्सार शेख आदिंनी परिश्रम घेतले.
तर यावेळी सुत्रसंचलन दत्ता जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन मंगेश भोसले यांनी मानले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.