ज्ञानदिप महिला विकास मंडळातर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

 

  ज्ञानदिप महिला विकास मंडळातर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा 




लातूर,दि.११ः खोरी गल्ली येथील ज्ञानदिप महिला विकास मंडळाच्यावतीने सोमवार,दि.८ मार्च  २०२१ रोजी जागतिक महिला दिन  उत्साहाने साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. शितल ससाणे या लाभल्या होत्या.अध्यक्षपदी महिला मंडळाच्या  अध्यक्षा मंदाकिनी गोडबोले या होत्या.प्रारंभी राष्ट्रमाता जिजाऊ,पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर,माता रमाई यांच्या प्रतिमांंचे पूजन करुन,माल्यार्पण करुन विनम्र  अभिवादन करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रा.शितल ससाणे यांनी प्रत्येक कर्तृत्ववान व्यक्तीच्या मागे स्त्री ही खंंबीरपणे उभी राहिली,त्यामुळे अनेक महापुरुष जगात नावारुपाला  आले.स्त्री ही पुरुषांइतकीच समाजाचा महत्वाचा घटक आहे,ही बाब लक्षात घेवून,तिच्या उन्नतीसाठी,विकासासाठी सहकार्य करणे हे पुरुष मंडळीचे काम आहे.महिलांनीही आपल्यातील शारीरिकअ आणि बौध्दिक न्यूनगंड दूर करुन समाजात सन्मानाने वावरले पाहिजे,स्वतःच स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणे  आवश्यक  आहे.
अध्यक्षीय समारोपातमध्ये मंदाकिनी गोडबोले यांनी महिला कुठेली कमी नाहीत जे जगाच्या इतिहासात सिध्द झाले आहे.महिलांची प्रगती ही राष्ट्राची प्रगती  आहे,असे विचार व्यक्त केले.
सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व  आभार प्रदर्शन दिग्वीजय गोडबोले यांनी केले.या कार्यक्रमाला अनुजा खुणे, शांताबाई कांबळे, ज्योती कांबळे,पुष्पा खुणे,जजवंता वाघमारे,कलावती गडेराव, वंदना गडेराव,पुष्पा दुधमांंडे,सुरेखा गोडबोले,निलांबरी कांबळे,बुध्दभूषण ढवळे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या