पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोप वाटिका
योजने करीता अर्ज करावेत
लातू,दि.12(जिमाका):- राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजनेबाबत सन 2020-21 मध्ये भाजीपाला पिकाची दर्जेदार व कीड- रोगमुक्त रोपे निर्मिती करून उत्पन्न व उत्पादनात वाढ करणे तसेच रोपवाटिके मुळे स्थानिक शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाची संधी उपलब्ध करून देणे पीक रचनेत बदल घडवून आणने व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न व भाजीपाला उत्पादनात वाढ करण्यासाठी या योजना राबविण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे.
रोपवाटिकेची उभारणी करावयाचे घटक व प्रति लाभार्थी महत्तम अर्थसहाय्याचे स्वरुप पुढीलप्रमाणे आहे:- घटक 3.25 मीटर उंचीचे फ्लट टाइप शेडनेट गृह (सांगाडा उभारणी) क्षेत्र /संख्या 1 हजार चौ. से.मी मापदंड रुपये 380 प्रति चौ. मी. प्रकल्प खर्च 3 लाख 80 हजार अनुदान रक्कम रुपये 1 लाख 90 हजार. घटक:- प्लॅस्टिक टनेल क्षेत्र/संख्याा 1 हजार चौसेमी मापदंड रुपये 60 प्रति चौ. मी. प्रकल्प खर्च 60 हजार रुपये अनुदान रक्कम 30 हजार रुपये. घटक:- पावर नॅपसॅक स्प्रेअर क्षेत्र संख्या 1 मापदंड रुपये 7 हजार 600 प्रकल्प खर्च रू. 7 हजार 600 अनुदान रक्कम 3 हजार 800. घटक प्लॅस्टिक क्रेटस:- क्षेत्र/संख्या 62 मापदंड रुपये 200 प्रकल्प खर्च 12 हजार 400 अनुदान रक्कम रुपये 6 हजार 200 एकूण प्रकल्प खर्च रू.4 लाख 60 हजार अनुदान रक्कम 2 लाख 30 हजार रुपये.
ही योजना प्रकल्प स्वरूपात राबवायची असल्याने उपरोक्त चारही घटकांची एकाच ठिकाणी उभारणी करणे बंधनकारक राहील. फक्त लातूर रेणापूर व शिरूर आनंतपाळ या तालुक्याचा लक्षांत शिल्लक रहात असल्यामुळे अर्ज मागविण्यात येत आहेत.
लातूर, रेणापूर व शिरूर अनंतपाळ या तालुक्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेत अर्ज करण्यासाठी महाडीबीटी या संकेतस्थळावर ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे दिनांक 16 मार्च 2021 पर्यंत करावेत.
अर्जासोबत 7/12, 8अ स्थळदर्शक नकाशा चतु: सीमा संवर्ग प्रमाणपत्र, कृषी पदविका बाबतची, कागदपत्रे महिला शेतकरी गट असल्यास त्याचे नोंदणी प्रमाणपत्र, आधार कार्ड व बँक पासबुक सत्यप्रत जोडावी अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी लातूर, रेणापूर, शिरूर आनंतपाळ या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी.एस. गवसाने यांनी केले आहे
****
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.