अटकावून ठेवलेल्या जंगम मालमत्तेचा 15 मार्च रोजी लिलाव
लातूर, दि. 12 (जिमाका) :- मोटार वाहन कर जमीन महसूलाची थकबाकी म्हणून वसूल योग्य असलेल्या रकमेच्या मागणी प्रित्यर्थ येणे आलेल्या रकमेच्या वसुलीसाठी निर्दीष्ट केलेली जंगम मालमत्ता अटकावून ठेवण्यात आलेल्या आहेत.
सदर कराची थकबाकी दिनांक 12 मार्च 2021 पूर्वी प्रादेशिक परिवहन अधिकारी लातूर यांच्याकडे देण्यात आली नाही तर उक्त वाहने जाहीर लिलावाद्वारे विकण्यात येईल. लिलावाच्या दिनांकापर्यंत थकबाकीदारास वाहनाचा कर भरण्याचा तसेच मालकी हक्काचा अधिकार राहणार नाही. अशा तऱ्हेने केलेली विक्री कायम होण्यास अधीन राहील.
प्रादेशिक परिवहन कार्यालय लातूर यांच्या वायूवेग पथकामार्फत एसटी डेपो शिवाजी चौक, लातूर व प्रादेशिक परिवहन कार्यालय लातूर व इतर ठिकाणी अटकावून असलेल्या व वाहन धारकामार्फत सोडविण्यात न आलेल्या वाहनांची लिलाव प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने या htttp:// www.eauction.gov.in संकेतस्थळावर करण्यात येईल लिलाव बाबत अटी व शर्ती वाहनांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल लिलाव दि.15 मार्च 2021 रोजी ( सकाळी 10.00 ते दुपारी 4.00) असे मोटार वाहन कर वसुल अधिकारी तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी लातूर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
****
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.