हासेगाव फार्मसीत जागतिक महिला दिना निमित्य विविध स्पर्धा घेऊन साजरा

 हासेगाव फार्मसीत जागतिक  महिला दिना निमित्य विविध स्पर्धा घेऊन साजरा




               श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था अंतर्गत लातूर कॉलेज  फार्मसी हासेगाव महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला  प्रमुख अतिथी म्हणून ऍडव्होकेट सौ   रजनी गिरवलकर  होत्या या कार्यक्रमाची सुरवात सरस्वती मातेचे पूजन करून करण्यात आले त्याच बरोबर मान्यवरांचा सत्कार सोहळा करण्यात आला .         तसेच प्रास्ताविक पर भाषण बी फार्मसीचे प्राचार्य डॉ विद्यासागर गाली  केले तर  ऍडव्होकेट सौ    रजनी गिरवलकर  यांनी शिक्षणाची आद्य देवी सावित्री बाई फुले याना मानाचा मुजरा करून भाषणाची सुरवात करत महिले ने स्वतःचे रक्षण करता आले पाहिजे त्याबरोबर महिलांच्या हक्क काय आहेत आज महिलांना समानतेची वागणून भेटती का , लिंग भेदभाव न करता स्त्री  पुरुष समान आहेत का , आज हि महिलेवरील अन्याय अत्याचार थांबलेले  नाही असे बोलून महिला संबंधित वेगवेगळ्या कलमा बदल माहिती सांगून महाविद्यालयातील विध्यार्थ्यांवर  ज्ञानाचा  प्रकाश टाकण्याचे काम या ठिकाणी केले आहे          जागतिक महिला दीना निमित्य विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते  ,  त्यामध्ये डी  फार्मसी ची  कु.  काळे स्नेहा रांगोळीत तर   मणियार अर्शन मेहंदी मध्ये प्रथम क्रमांक मिळवला तर महाविद्यालयातील विद्यार्थिनींना पेन पाऊच देऊन जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला .         या कार्यक्रमाला श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री भीमाशंकर अप्पा बावगे , संस्थेचे उपाध्यक्षा सौ जयदेवी बावगे  सचिव  श्री वेताळेश्वर बावगे  , कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे,   ,लातूर कॉलेज ऑफ बी आणि एम फार्म  फार्मसी चे प्राचार्य डॉ . विद्यासागर गाली, लातूर कॉलेज ऑफ डी फार्मसी हासेगाव च्या प्राचार्या सौ शामलीला  बावगे ,लातूर कॉलेज ऑफ डी फार्मसी लातूर चे   प्राचार्य श्री शेख कादर लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरेपी चे प्राचार्य रबीक खान , राजीव गांधी पॉलीटेकनिक च्या प्राचार्या सौ योगिता बावगे    , ज्ञानसागर विद्यालयाचे  मुख्याध्यापक कालिदास गोरे , गुरुनाथअप्पा बावगे  इंटरनॅशनल इंग्लिश स्कुल चे मुख्याध्यापक आनंद शेंडगे आणि  लातूर सायन्स कॉलेज चे प्राचार्य श्री वाडीवाले,लातूर कॉलेज आय टी आय कॉलेज   प्राचार्य सतीश गायकवाड ग्रंथपाल श्री अदावळे  बी. डी त्याच बॅरो बरोबर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विध्यार्थी उपस्तित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या