औशात विना मास्क फिरणा-यावर दंडात्मक कार्यवाही

 औशात विना मास्क फिरणा-यावर दंडात्मक कार्यवाही




औसा मुख्तार मणियार

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव निर्माण झाल्याने विनाकारण गर्दी करीत रस्त्यावरुन विना मास्क मोटारसायकल वरून जाणा-या बेजबाबदार नागरिकांकडून प्रशासनाने दि.११ मार्च २०२१ गुरुवार रोजी लातुरवेस हनुमान मंदिर बस स्टैंड औसा येथे तहसिलदार शोभा पुजारी,महसुल विभागाच्या नायब तहसीलदार वृषाली केसरकर, पोलिस निरीक्षक एन बी ठाकूर व त्याचे सहकारी तसेच नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मोटारसायकलवर विना मास्क येणाऱ्या कडुन आर्थिक दंड वसूल केला.महाशिवरात्रीमुळे शहरात व ग्रामिण भागातील शिवालयात दर्शनासाठी जाणा-यांची संख्या लक्षात घेऊन औसा येथील प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी आरोग्य सेतू अपच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आर्थिक दंडाची कार्यवाही केली.गुरुवार दि.११ मार्च रोजी महसूल, पोलिस व नगरपरिषद विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी औसा शहरातील बेजबाबदार नागरिकांना समज यावी म्हणून विना मास्क फिरणा-यांना प्रत्येकी शंभर रुपये दंडाची पावती देऊन आर्थिक  दंड ८ हजार रुपये वसूल केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या