ब्ल्यु बर्ड इंटरनॅशनल स्कुलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
औसा (प्रतिनिधी) : तालूक्यातील आलमला येथील विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत असलेल्या ब्ल्यु बर्ड इंटरनॅशनल स्कुल मध्ये जागतीक महिला दिनाचे औचित्य साधुन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 08 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. अलका धाराशिवे, सौ. मेघा धाराशिवे व डॉ. सौ. अनुराधा धाराशिवे, ब्ल्यु बर्ड इंटरनॅशनल स्कुलच्या प्राचार्या फिरदोस देशमुख, सौ. स्वाती कापसे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ब्ल्यु बर्ड इंटरनॅशनल स्कुलच्या प्राचार्या देशमुख यांनी जागतीक महिला दिनाचे महत्व सांगून महिलांना त्यांच्या अधिकाराविषयी जागरूक करणे हा या जागतीक महिला दिनाचा मुख्य हेतु असल्याचे सांगीतले.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या डॉ. अनुराधा धाराशिवे यांनी दंत शल्य पदवी संपादन केल्याबद्दल त्यांचा विषेश सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना डॉ. अनुराधा धाराशिवे म्हणाल्या 8 मार्च हा जागतीक महिला दिन साजरा करताना या दिवशी प्रत्येक जण आपआपल्या परीने महिलाविषयी आदर व्यक्त करतो. प्रत्येक स्त्रिचे आपल्या आयुष्यातील स्थान अतिशय महत्वाचे असून तिने केलेल्या प्रत्येक कार्याचा आदर करून तिचा सन्मान केला जातो असे सांगितले. या कार्यक्रमात ब्ल्यु बर्ड इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थिनीने महिला शिक्षीकाप्रती सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करून जान्हवी जाधव व अस्किया पटेल यांनी जागतीक महिला दिनाविषयी बोलताना समाजजिवनात जिवन जगत असताना हसुन प्रत्येक वेदना विसरणारी व नात्यामध्ये बंदीस्त असणारी व प्रत्येक वाट प्रकाशमान करणारी ती शक्ती आहे एक नारी असे सांगून महिलामध्ये असणाया अपार शक्तीही सृष्टीचा आधार असल्याचे सांगितले. याकरिता महिलांचा नेहमीच सन्मान करा कारण तिच प्रत्येकाच्या जिवनाचा सार असल्याचे संागितले. अशा या जिवनाचा शिल्पकार होऊन तुमच्या जिवनाला आकार देणाया प्रत्येक स्त्रीला जागतीक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुवर्णा वागदरे, हलीमा अरब, सुलभा भोसले, रश्मी दुधनकर, दिपा पोतदार यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैष्णवी वाघमारे हीने तर आभार प्रदर्शन समिक्षा निलंगेकर हीने केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.