कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला चालना देणारा आणि लातूरकरांना नवी संधी देणारा अर्थसंकल्प- महापौर विक्रांत गोजमगुंडे
लातूर/ प्रतिनिधी: राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सोमवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पाने लातूरकरांना अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय समक्षिकरण करण्याकरिता राज्य शासनाने भरीव तरतूद केलेली आहे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्यामुळे हे
शक्य झाले आहे. या अर्थसंकल्पात लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय विज्ञान केंद्रातील बाह्य रुग्ण विभागासाठी ७३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून महानगरपालिकेच्या पंडित जवाहरलाल नेहरू रुग्णालय परिसराचाही कायापालट होणार आहे.या रुग्णालयात अद्ययावत व सुसज्ज असा बाह्यरुग्ण विभाग विकसित केला जाणार आहे. अर्थसंकल्पात मुख्यमंत्री रस्ते विकास योजनेतून राज्यातील शहरांमधील बाजारपेठ भागातील रस्ते व सुशोभीकरण याकरिता मोठ्या प्रमाणात निधी मिळणार आहे. पालकमंत्री अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनात या निधीतून गंजगोलाई परिसरातील रस्ते व एकूणच परिसराचा विकास केला जाणार आहे.
एकंदर सर्व समाजघटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे.सामान्य जनता,गरीब व कष्टकरी तसेच युवक आणि महिलांसाठीही अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. शहरे व ग्रामीण भागांसह एकूणच राज्याच्या विकासाची काळजी या अर्थसंकल्पात घेण्यात आली आहे. कोरोनानंतर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी उपाययोजना यात करण्यात आल्या आहेत.
लातूरसाठी भरभरून दिल्याबद्दल अर्थमंत्री अजितदादा पवार व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पालकमंत्री अमित देशमुख यांचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी आभार मानले आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.