महाविकास आघाडी सरकारच्या अर्थसंकल्पात मराठवाडा पूर्णपणे दुर्लक्षित - माजीमंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांची टीका

 

महाविकास आघाडी सरकारच्या अर्थसंकल्पात मराठवाडा पूर्णपणे दुर्लक्षित - माजीमंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांची टीका





 निलंगा/प्रतिनिधी:राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला.या अर्थसंकल्पात मराठवाड्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले असून सामान्य जनतेला दिलासा देण्याऐवजी श्रेय लाटण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला असल्याची टीका माजीमंत्री आ.
संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केली.
   अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना आ.निलंगेकर म्हणाले की,मराठवाड्याचा विचार सत्ताधाऱ्यांनी केलेला नाही. या भागातील दुष्काळ दूर करण्यासाठी आमच्या सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प मंजूर करून काम सुरु केले होते. मराठवाड्यासाठी हा प्रकल्प वरदान ठरणारा होता.परंतु विद्यमान सरकारने अर्थसंकल्पात त्याचा उल्लेखही केलेला नाही.उलट मराठवाड्याच्या योजना इतर विभागांसाठी पळवण्यात आल्या.मराठवाड्यातील जनतेच्या पदरी यामुळे निराशाच आली आहे. पायाभूत सुविधांचा एकही प्रकल्प महाविकास आघाडी सरकारने मराठवाड्याला दिला नाही.
  कोरोना काळात मराठवाड्यात बेकारांची संख्या वाढली पण त्यांना काम देण्यासाठी कसलीही योजना मंजूर करण्यात आली नाही.वाढीव वीज बिलांमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.पण या संदर्भात दिलासा देण्यात आला नाही, असेही ते म्हणाले.
 आ.निलंगेकर यांनी सांगितले की, केंद्र सरकारने यापूर्वीच जाहीर केलेल्या विविध योजना अर्थमंत्र्यांनी पुन्हा सांगितल्या.त्याच योजना नव्या करून सांगत त्यांनी वेळ मारून नेली.ज्या योजना आता चालवल्या जातील त्याच्या निधी केंद्र सरकारकडूनच मिळेल.त्यांचे सहाय्यक घेऊनच या योजना चालवल्या जातील.एकीकडे केंद्र सरकारला नावे ठेवायची ,त्यांच्या मदतीनेच राज्य चालवायचे आणि श्रेय लाटायचे असे हे दुतोंडी सरकार असल्याचेही ते म्हणाले.
   राज्यात अनेक प्रकल्प यापूर्वीच सुरू आहेत. त्यांच्यासाठी तरतूद करताना हे प्रकल्प नव्याने सुरू करत असल्याच्या घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आल्या.विशेष म्हणजे राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर मोठ्या प्रमाणात कर लावलेला आहे.या विषयातही केंद्राकडे बोट दाखवणाऱ्या राज्य सरकारने जनतेला दिलासा दिला नाही. मराठवाड्यातील जनतेची तर या अर्थसंकल्पात चेष्टाच करण्यात आलेली असल्याचे सांगत आ. निलंगेकर यांनी या अर्थसंकल्पाला उणे २ गुण देऊ केले आहेत.


--

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या