जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने खरोसा येथे सक्षमीकरण मेळावा संपन्न*

 *जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने खरोसा येथे सक्षमीकरण मेळावा संपन्न*





*खरोसा*:-मुख़्तार मणियार 

'सावित्रीबाईफुले निधी लिमिटेड-लातूर, ग्रामीण जनता शिक्षण प्रसारक मंडळ, चलबुर्गा ,सावित्रीबाई फुले महासंघ-खरोसा यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालय -खरोसा येथे बचत गटाच्या महिलांसाठी महिला सक्षमीकरण मेळावा घेण्यात आला.सामाजिक अंतर ठेवून व मास्कचा वापर करून हा कार्यक्रम घेण्यात आला.

     यावेळी सरपंच संयोगिता साळुंके यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले  व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलीत करून मेळाव्याचे उद्घाटन केले.,औसा पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी सतिष पाटील यांनी महिलांनी उद्योग क्षेत्रात भरारी घेऊन व्यवसाय सुरु करून आत्मनिर्भर बनावे,सक्षमीकरण चळवळ गतिमान करावी असे आवाहन केले. महिला बचत गटांच्या माध्यमातून विकास कामे करा ,स्वतः च्या व कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी,असे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रवीण नळवंडीकर म्हणाले. प्राचार्य शेषराव बिराजदार यांनी मुलां मुलींना शिकवा,स्त्रीभ्रुण हत्या करू नका विषमता बाळगू नका, उच्च शिक्षण घेऊन संन्मानाने आदर्श जीवन जगा असे सांगितले. याप्रसंगी ग्रामपंचायत खरोसा चे उपसरपंच शहाजी कांबळे, ग्रामपंचायत सदस्य विशाल क्षीरसागर,  जयराज होगले,कामिनी खरोसेकर ,खलील शिकलकर, अजय साळुंके, पर्यवेक्षिका श्रीमती गुगळे, आरोग्य सेविका श्रीमती कांबळे, आरोग्य सेवक बिबे,सहशिक्षक संजय पाटील, लिंबराज होगले,समाजसेवक हरिश्चंद्र सुडे ,ग्रामविकास अधिकारी आय.आर.शेख ,विस्तार अधिकारी श्री तेलंग यांची उपस्थिती होती.यावेळी कोरोनायोद्धा म्हणून आशा स्वयंसेविका, आंगणवाडी कार्यकर्ती,अँन्टी कोरोना फोर्स यांना सन्मानपत्र देण्यात आले. बचत गटाच्या महिलांना कर्ज वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी सरपंच संयोगिता साळुंके  होत्या. प्रास्ताविक ग्रामीण जनता शि.प्र.मंडळाचे अध्यक्ष  प्रा.दत्तात्रय सुरवसे यांनी केले.  आभार प्रदर्शन सावित्रीबाई फुले निधी चे संचालक सुयोग सुरवसे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महासंघाचे अध्यक्ष गंगासागर राऊतराव,ज्योती चोपणे,योगिता क्षीरसागर, महादेवी पांचाळ, सिंधू नरवटे,मनोरमा जाधव ,सोमनाथ क्षीरसागर, सोमनाथ डोके, बबीता क्षीरसागर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी खरोसा व रामेगाव येथील बचत गटांच्या महिला  उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या