औसा शहरातील वराह ( डुकराचा) बंदोबस्त करावा औसा नगरपरिषदेची कैकाडी समाजाचे अध्यक्षांना नोटीस
औसा मुखतार मणियार
औसा शहरातील वराह (डुकरांचा) बंदोबस्त करावा यासाठी औसा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी औसा कैकाडी समाजाचे अध्यक्ष लिंबराज जाधव यांना दि.१ मार्च २०२१ सोमवारी रोजी नोटीस बजावली आहे.या नोटीसद्वारे अशी माहिती दिली आहे की उपरोक्त संदर्भिय पत्राच्या अनुषंगाने अपणास कळविण्यात येते की, आपणास यापुर्वी अनेक वेळा नोटीस देवून ही वराह (डुकराचा) बंदोबस्त करीता नसल्याचे माझ्या निर्दशनास आले आहे. शहरात सर्वत्र वराहाचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढले असून शासकीय कार्यालये, व शहरातून अनेक तक्रारी या कर्यालयात प्राप्त झाल्या आहेत. आपण औसा शहरात वराह मोकाट सोडून वराह पालनाचा व्यवसाय करत आहे. सदर व्यवसाय हा नियमानुसार स्वत्ता च्या बदिस्त जागेत करणे बंधनकारक आहे. आपण तसे न करता वराह मोकाट सोडून वराह पालनाचा व्यवसाय करत आहे. औसा शहरात वराह पासून डेंगू, स्वाईन पल्लू सारखे व इतर रोगराई होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कोव्हीड -19 कोरोना, डेंग्यू व इतर रोगराई टाळण्याकरीता 100 टक्के वराहाचा बंदोबस्त करावा.
तसेच सध्या देशामध्ये कोव्हीड -19 कोरोना विषाणूंची साथ चालू आहे. तसेच कोव्हीड 19 चा डेगू, स्वाईन फ्लू या सारख्या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता आपण 3 दिवसात आपल्या स्तरावर 100 टक्के वराहाचा बंदोबस्त करावा. अन्यथा आपणा विरुध्द फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नोंद करण्यात येईल व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती औदोगिक नगरी अधिनियम 1965 वे कलम 294 अन्वये प्रशासनामार्फत योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची नोद घ्यावी.असे औसा नगर परिषदेच्या वतीने कैकाडी समाजाचे अध्यक्ष लिंबराज जाधव यांना नोटिसाद्वारे कळविले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.