जमीयत उलमा-ए-हिंदची निलंगा तालुका व शहर कार्यकारणी जाहिर

 जमीयत उलमा-ए-हिंदची निलंगा तालुका व शहर कार्यकारणी जाहिर 


निलंगा (प्रतिनिधी):- जमीयत उलमा-ए-हिंद या राष्ट्रीय संस्थेची निलंगा तालुका कार्यकारणी नुकतीच जिल्हाध्यक्ष अब्दुल जब्बार मजाहिरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आली. यावेळी निलंगा तालुकाध्यक्ष म्हणून मुफ्ती उस्मान कास्मी यांची तर उपाध्यक्ष म्हणून मुस्तफा झारेकर,हाफीज जाकीर,जनरल सेक्रेटरी म्हणून मोईज सितारी,सचिव इस्माईल लदाफ, मौलाना उमेस अखिल अहेमद,कोषाध्यक्ष शेरु उस्मानसाहब,सदस्य म्हणून मगदूम पटेल,हाजी रब्बानी बागवान,हाजी सत्तार कुरेशी,महेमुद अत्तार,मुश्ताक सितारी,गौस पटेल (औराद शहाजानी),अजहर चाऊस (निटुर),इरशाद आलम (केळगाव),हाफीज असद साहब (चिंचोली स.),हाफिज मुबीन (कासार सिरसी),हाफीज वसीम,शफीयोद्दीन सौदागर यांची निवड करण्यात आली. तर शहराध्यक्ष म्हणून मुफ्ती रिजवान,उपाध्यक्ष हबीब खानसाहब,मुफ्ती शाज,जनरल सेक्रेटरी खिजर अली इनामदार,सचिव मुफ्ती मरगुब रहेमान,मौलाना अब्दुल जलील,कोषाध्यक्ष मौलाना इदरीस जमील अहेमद,सदस्य म्हणून इरफान गुलजार अली सय्यद,अय्युब हमीदसाब बागवान,हाजी अब्दुल खलील,अजरोद्दीन सितारी,हाजी फारूख इब्राहीमसाब शेख,ताजखान साब,मुजीब सौदागर यांची निवड करण्यात आली.यावेळी शहर व तालुक्यातील उलेमांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या