मुख्याधिकार्‍यांनी नोटीस बजावताच वराह पकडने सुरु

 मुख्याधिकार्‍यांनी यांनी नोटीस बजावताच वराह पकडने सुरु





औसा( प्रतिनिधी )औसा शहरातील वाढत्या वराह संख्येमुळे नागरिकास त्रास होत असून कैकाडी समाज वराहांना मोकाट सोडून वराहांचा व्यवसाय करतात. परिणामी शहरात वराह व त्यांच्या पासून होणाऱ्या घाणीमुळे चिकन गुनिया, हिवताप डेंग्यू, स्वाइन फ्लू अशा साथीच्या रोगांचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे तसेच देशभरात पुन्हा कोरोना विषाणूची दुसरी लाट उसळी घेत आहे त्यामुळे औसा शहरातील मोकाट फिरणाऱ्या वराहांचा 100 टक्के बंदोबस्त करावा अशी नोटीस मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी कैकाडी समाजाच्या अध्यक्षास बजावली  होती याची दखल घेत कैकाडी सामाजाचे अध्यक्ष यांनी  दि 6  मार्च 2021 रोजी पासुन शहरातील वराह पकडण्याची  मोहीम सुरु केली आहे.औशाच्या  मुख्याधिकारी तानाजी चव्हाण  यांनी कैकाडी समाजाचे अध्यक्ष यांना नोटीस बजावली असून त्याची एक प्रत त्यांनी पोलिस निरीक्षक औसा यांनाही दिली आहे.

महाराष्ट्र नगरपरिषद,नगरपंचायत व औद्योगिक नागरी कायदा 1965 चे कलम 294 अन्वये शहरातील मोकाट फिरणाऱ्या व वराहांचा बंदोबस्त नाही केल्यास फौजदारी स्वरूपाचा गुन्हा पालकावर नोंदविण्यात येईल अशी तंबीही मुख्याधिकारी नगर परिषद औसा यांनी नोटिशी द्वारे दिली आहे



चौकट


काही वर्षा पूर्वी औसा नगरपालिका मध्ये 100% वराह मुक्त शहर असा ठराव घेऊन मोठ् मोठ्या पोस्टर लावले होते त्या वेळी सुद्धा चाळीस पन्नास वराह पकडून मोहीम बंद केली होती? यावेळीस  सुध्दा असाच होनार की 100% वराह मुक्त शहर होनार का ?  याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या