औसा खरेदी केंद्रात हमीभावाने हरभरा खरेदीला सुरुवात

 औसा खरेदी केंद्रात हमीभावाने हरभरा खरेदीला सुरुवात



औसा

आफताब शेख 

जर वर्षी प्रमाणे याही वर्षी नाफेड अंतर्गत किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हंगाम २०२०-२१ या चालू हंगामासाठी हरभरा या मालाच्या खरेदीला सुरुवात झाली आहे. हमीभाव ५१००/- असा ठरलेला आहे. हरभरा खरेदीचे उद्घाटन शेतकरी श्री दिलीप अंबाजी चान्दुरे रा फत्तेपूर  यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी औसा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे सभापती श्री संतोष सोमवंशी, कृषी उत्पन्न बाजार समिती औसा चे सभापती राजेंद्र भोसले  उपसभापती किशोर जाधव, सचिव मुश्ताक शेख, खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक गणेश क्षिरसागर व अन्य मान्यवर तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते.

तरी औसा तालुक्यातील सर्व शेतकर्यांनी नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे सातबारा, तलाठी पीकपेरा प्रमाणपत्र, आधार कार्ड लिंक असलेले बँक पासबुक झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स इत्यादी औसा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ म औसा येथे येऊन नोंदणी करून घ्यावी व हमीभावाचा लाभ घ्यावा असे आवाहन औसा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे सभापती  संतोष सोमवंशी यांनी केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या