उदगीर प्रतिनिधी
दिनांक 24 मार्च 2021 रोजी सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाणे उदगीर शहर हद्दीतील पत्तेवार चौकात इसम नामें मिर्झा नोमान सरदार बेग व असद खुर्शीद शेख या दोन्ही चिकन विक्री त्यात व्यापाराच्या कारणावरून वाद झालेला आहे. सदर वादाचे हाणामारी मध्ये रूपांतर होऊन दोन्ही पार्टीचे मिळून आठ लोक जखमी झालेले आहेत. तसेच त्यापैकी दोघे जण गंभीर जखमी झालेले आहेत. या सर्वांचा उदयगिरि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उदगीर येथे उपचार सुरू आहे. घटनास्थळी व हॉस्पिटल येथे पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. सदर घटनास्थळास मा पोलीस अधीक्षक साहेब श्री निखिल पिंगळे सर , माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री हिम्मत जाधव तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी श्री डॅनियल बेन यांनी घटनास्थळी भेटी दिलेली आहे. दोन्ही पार्टीवर गुन्हा रजिस्टर नंबर 74/2021व 75/2021कलम 307, 326 भादवी सह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करून क्रॉस कंप्लेंट दाखल करण्यात आलेली आहे. आरोपिताना ताब्यात घेतले असून सदर दोन्ही गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री गजानन पाटील हे करत आहेत. तपासाबाबत त्यांना योग्य ते सूचना व मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. तरी जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता प्रस्थापित करण्यात सहकार्य करावे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.