प्रेस नोट
औसा तालुक्यातील कोळेवाडी येथील अनैतिक संबधाच्या संशयाचे कारणावरुन तरुणाचा खुन केलेल्या आरोपीस मा. सत्र न्यायालयाकडुन जन्मठेप व १००००/- रुपये दंडाची शिक्षा
लातुर जिल्हयातील पोलीस स्टेशन औसा हददीत मयत नामे तुषार अरविंद सर्जे, वय-२५ वर्ष, रा. कोळेवाडी- येल्लारवाडी ता. औसा जि. लातूर याचे आरोपीच्या पत्नीसोबत अनैतिक संवध असल्याचे संशयावरुन आरोपीने मयताचे पोटात चाकू खुपसुन त्याचा खून केल्याची धटना दि. २१/१२/२०१९ रोजी दुपारी १५.०० वा सुमारास घडली होती.
सदर प्रकरणाची माहीती मिळताच पोलीस स्टेशन औसा येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी भेट देवुन आरोपीचा शोध घेवून तात्काळ अटक केली.
सदर प्रकरणी दि. २१/१२/२०२० रोजी पोलीस स्टेशन औसा जिल्हा लातुर येथे गुरनं ३२५/२०१९ कलम ३०२ भांदवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला, सहायक पोलीस निरीक्षक राहुल डी. बहुरे, पोलीस स्टेशन औसा यांनी मा. पोलीस अधिक्षक लातुर, मा. अप्पर पोलीस अधिक्षक, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, औसा , मा, पोलीस निरीक्षक, औसा यांचे मार्गदर्शनाखाली सतत परीश्रम घेवुन, गुन्हयाचा तपास पुर्ण केला.
* सदर गुन्हयाचा अनुषंगाने सबळ पुरावे व परीस्थीतीजन्य पुरावे हस्तगत करुन दि. १९/०३/२०२० रोजी सदर गुन्हयातील आरोपी विरुदध मा. न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले.
* सदर गुन्हयात सत्र खटला क्रंमाक ५७/२०२० कलम ३०२ भादवि अन्वये मा. जिल्हा सत्र न्यायालय, लातुर येथे सुनावणी सुरु करण्यात आली साक्षीपुरावे सुरु करण्यात येवुन दि. १८/०३/२०२१ रोजी साक्षीपुरावे पुर्ण करण्यात आले व एक वर्षाच्या आत सदर केसचा निकाल लावण्यात आला.
• सदर गुन्हयातील आरोपी बालाजी फुलचंद सर्ने, वय २२ वर्षे, रा. कोळेवाड़ी- येल्लोरीवाडौ, ता, औसा यास मा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश लातूर श्री. आर.एस. तिवारी साहेब यांचे न्यायालयाने साक्षीपुरावे व परिस्थीतीजन्य पुरावे आधारे आरोपीस जन्मठेप व १००००/- रुपये दंड अशी शिक्षा दि. २४/०३/२०२१ रोजी सुनावण्यात आली आहे.
• सदर खटल्यात शासनाचे वतीने श्री. सतोष क्हि देशपांडे, जिल्हा सरकारी वकील तथा शासकीय अभियोक्ता. लातुर यांनी मा न्यायालयात बाजु मांडली, सरकार पक्षातर्फ १० साक्षीदार तपासण्यात आले,
• सदर खटल्यात कोर्ट पैरवी अधिकारी म्हणुन महीला पोलीस अंमलदार १५२२/ विजया पकाले समन्स कामकाज पोलीस अंमलदार १६६२ / ईश्वर व्यवहारे यांनी काम पाहीले.
• मा. पोलीस अधिक्षक, लातुर, मा. अण्पर पोलीस अधिक्षक, लातूर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, ओसा, मा. पोलीस निरीक्षक औसा यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राहुल डी. बहुरे, पोलोस स्टेशन औसा यांनी त्यांचे सहकारी अधिकारी व अमलदार यांचे मदतीने तपास केला आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.