ना. अमित विलासराव देशमुख : आधुनिक साखर उद्योगाचे जनक
ग्रामीण अर्थव्यवस्थेत केली आर्थिक क्रांती
ना.अमित विलासराव देशमुख लातूरकरांच्या सुखदुःखाशी घट्टपणे जोडलेलं नाव आहे. आज २१ मार्च त्यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांची राजकीय कारकीर्द अशीच बहरत जावो आणि लोकसवेतील कार्य अखंड वाढत जावो ही या निमित्ताने त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा
लोकसेवेची परंपरा
लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख यांनी लातूरचा सर्वांगीण विकास केला आहे. आधुनिक लातूर उभारणीचे ते शिल्पकार आहेत. राजकारणातून लोकसेवा करण्याचे फार मोठे कार्य त्यांनी केले. विकासात्मक आणि विधायक कार्य करून एक वैभवशाली परंपरा त्यांनी निर्माण केली आहे. या लोकसेवेच्या परंपरेचा पाया आदरणीय विलासराव देशमुख यांनी घातला ही इमारत उभी करण्याचे नियोजनपूर्वक प्रयत्न सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी केले आहे. ना. अमित विलासराव देशमुख यांची राजकीय वाटचाल हीच परंपरा पूढे घेऊन जात आहे.
विकासात्मक राजकारणाची
रौप्यमहोत्सवी वाटचाल
ना. अमित विलासराव देशमुख यांचे राजकारणातील पदार्पण युवक काँग्रेस आणि विलासराव देशमुख युवा मंच माध्यमातून झाले. युवकांचे संघटन आणि बांधणी करून युवा ऊर्जेला विधायक, सकारात्मक आणि विकासात्मक दिशा त्यांनी दिली. आज राजकारण, सहकार, कृषि, ग्रामविकास, सिंचन, सांस्कृतिक, वित्तीय क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य मैलाचा दगड ठरले आहे.
या प्रसंगी एका अर्थाने विचार केला तर त्यांच्या राजकारणातील सार्वजणीक जिवनाची २४ वर्ष संपून २५ वे वर्ष सुरू झाले आहे. या काळातील कार्य सर्वासाठी अभिमानासपद आहे. त्यांच्या राजकारणातील सहभागा बददल सहज नजर टाकली तरी लक्षात येते. लोकसभा निवडणुक (१९९९, २००४, २००९, २०१४, २०१९), विधानसभा निवडणुक (१९९९, २००४, २००९, २०१४, २०१९) या प्रमाणेच या कालावधीत झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थाच्या निवडणूक प्रचारात त्याचा सक्रीय सहभाग राहीला आहे. आदरणीय विलासराव देशमुख यांचा आदर्श आणि सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाने राजकारणाच्या माध्यमातून लोकसेवा म्हणजे ईश्वर सेवा हे ब्रीद मानूनच काम करीत आहेत. हा वाढदिवस म्हणजे ना. अमित विलासराव देशमुख यांच्या सार्वजनिक जिवनाचे हे रौप्य महोत्सवी वर्षच आहे.
संस्थात्मक कामाची उभारणी
एखाद्या भागाचा किंवा त्या भागातील लोकांचा विकास करायचा असेल तर विकासालापूरक विविध संस्थांची उभारणी करावी लागते. लातूर जिल्हयात अशा संस्थाची गरज ओळखून ना. अमित विलासराव देशमुख यांनी विविध संस्थांची उभारणी केली. या संस्था सक्षमपणे चालवून त्यांच्या माध्यमातून लोकोपयोगी कामे केली. यामध्ये विलास कारखाना, विलास कारखाना युनिट २, विलास बँक, ट्वेंटीवन शुगर, ट्वेंटीवन शुगर युनीट २, विलासराव देशमुख फाउंडेशन अंतर्गत शैक्षणिक संस्था यासारख्या विविध संस्थांची उभारणी करून त्या अत्यंत व्यवस्थित चालविल्या जात आहेत.
लातूर सहकारभूमी
महाराष्ट्र राज्यामध्ये मराठवाडा हा भाग मागासलेला म्हणून ओळखला जात होता. मराठवाड्याची ही दुर्दशा बदलण्यासाठी ग्रामविकास आणि विशेषत: शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे आवश्यक होते, हे मर्म ओळखून आदरणीय विलासराव देशमुख यांनी सहकार चळवळ रुजवली. सहकारीतत्वावर साखर उद्योग आणि वित्त संस्थांची उभारणी केली. या अंतर्गत लातूरकरांचे जीवनमान बदलणारा मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना त्यांच्या दूरदृष्टीतून उभा राहिला. या माध्यमातून खऱ्या अर्थाने सहकाराचा पाया घातला गेला आणि पाहता पाहता शेतकऱ्यांचे, ग्रामिण भागाचे आणि लातूरचे चित्र बदललं. हीच परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी ना.अमित विलासराव देशमुख यांनी विलास सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली आणि एका अर्थाने आधुनिक साखर उद्योगाची सुरूवात झाली. मांजरा साखर कारखाना हा सहकार क्षेत्रात पथदर्शी कारखाना ठरला तर विलास कारखाना उभारणी करून आधुनिक साखर उद्योगाची मुहूर्तमेढ ना. अमित विलासराव देशमुख यांनी रचली असेच म्हणावे लागेल.
आधुनिक साखर उद्योग विलास कारखाना
ना. अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली उभारणी झालेला विलास सहकारी साखर कारखाना एक वैशिष्ट्यपूर्ण साखर कारखाना आहे. या कारखान्याची उभारणी अल्पकाळात झाली, अत्यंत कमी उभारणी खर्च झाला. एवढेच नाही तर कर्जाची मुदतपूर्व परतफेड करणारा हा कारखाना ठरला आहे. कारखान्याची वाटचाल आगळीवेगळी ठरली. आर्थिक व्यवस्थापन, उत्कृष्ठ तांत्रिक कार्यक्षमता, पाणी व्यवस्थापन, पाणी पुर्नवापर, वृक्षारोपण, उत्पादन खर्च सर्वात कमी, सभासदांना सर्वोत्तम ऊस दर, पर्यावरण संवर्धन, यामुळे हा कारखाना आधुनिक साखर उद्योगासाठी पथदर्शी ठरला आहे
आधुनिक ऊस शेतीला चालना
विलास सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून कार्यक्षेत्रात उसाची एकरी उत्पादकता वाढावी, उत्पादन खर्च कमी व्हावा, ऊस उत्पादकांना ऊस शेती चांगल्या पद्धतीने करता यावी यासाठी रुंद सरी पध्दत, ऊस शेती आणि तोडणीसाठी यंत्राचा वापर, सूक्ष्म सिंचन वापर, सभासदांना एकरी उत्पादकता वाढावी यासाठी ऊस लागवड आणि जोपासना यासंदर्भात शास्त्रीय माहिती दिली. यामुळे आधुनिक ऊस शेतीला चालना मिळाली आहे. सभासद व ऊस्उत्पादकांसाठी माती परीक्षण, ऊस पथदर्शक सभासद, रासायनिक खत पुरवठा, कृषी अवजारे पुरवठा, ऊसपीक स्पर्धा, पायाभुत बेणे वाटप, ठिबक व तुषार संच वितरण, ऊसरोप पुरवठा योजना, ऊस्बेणे मळा योजना, ऊस शेती यांत्रिकीकरण, ऊस उत्पादक संपर्क अभियान, जलसंधारण प्रकल्प आदी राबविलेल्या योजना सहकार आणि साखर उदयोगासाठी मार्गदर्शक ठरल्या आहेत.
उपपदार्थ प्रक्रिया उद्योग
मराठवाडा विशेषत: लातूरमध्ये पावसाची अनियमितता आहे. यामुळे ऊसक्षेत्र सुद्धा नेहमी कमी जास्त होते, अशा परिस्थितीत ऊस उत्पादक आणि साखर उद्योग अडचणीत येतो याकरीता ना. अमित देशमुख यांनी केवळ साखर उत्पादन न करता आसवनी प्रकल्प, सहवीज निर्मिती प्रकल्प उभारणी केली आहे. या माध्यमातून मदयार्क, इथेनॉल, बायोगॅस व कंपोस्ट निर्मीती केली जात आहे. साखर उत्पादना सोबत उपपदार्थ प्रकीया प्रकल्पाची उभारणी केल्याने संस्थेची आर्थिक स्थिती चांगली आहे. यामुळे सभासदांना आणि ऊस उत्पादकांना योग्य मोबदला देणे कारखान्याला शक्य होते.
यांत्रिकीकरणाला चालना
आजचे युग औदयोगिक व यांत्रिकरणाचे आहे. बदलत्या परिस्थितीमध्ये सर्वच क्षेत्रात मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण होत आहे. ऊसशेती आणि साखर उद्योगासमोर तर मनुष्यबळाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. काळाचं पाऊल ओळाखून ना. अमित देशमुख यांनी ऊसशेती व तोडणी करीता यांत्रिकीकरणाला चालना दिली. ऊसशेती यांत्रिकीकरण योजना, ऊस तोडणी यंत्र खरेदी योजना, लहान ट्रॅक्टर व टायरगाडी खरेदी योजना राबविली. यामुळे विलास साखर कारखान्याची ऊस तोडणी मोठ्या प्रमाणात हार्वेस्टरद्वारा होत आहे. कार्यक्षेत्रात व्यवसायीक संधी उपलब्ध झाली असून ऊसाचे वेळेवर गाळप देखील होत आहे.
पाणी व्यवस्थापन
लातूर जिल्हयातील पर्जन्यमान अनिश्चीत आहे. याकरीता पाण्याचे काटेकोर नियोजन ही काळाची गरज आहे. ना. अमित विलासराव देशमुख यांनी साखर उदयोगाची उभारणी करीत असतांना ऊसशेती आणि साखर उदयोगांच्या पाण्याचे व्यवस्थापन काळजीपूर्वक केले आहे.
कारखाना उभारणी पासून कारखाना प्रक्रीया, कारखाना कार्यस्थळ व कारखाना कार्यक्षेत्रात पाणी व्यवस्थापन करणे व जलप्रदूणमूक्त उदयोगाकरीता अभिनव प्रयोग केले आहेत. कारखाना प्रक्रीयेत पाणी निर्मिती, पाणी पुर्नवापर, कारखानास्थळी जलव्यवस्थापन आणि कारखाना कार्यक्षेत्रात पाणी व्यवस्थापन प्रकल्प राबविले आहेत. विलास कारखाना एकात्मिक पाणी व्यवस्थापन प्रकल्प अंतर्गत जलसंवर्धन आणि जलव्यवस्थापन प्रकल्प राबविले. या उपक्रमातील सर्व प्रकल्प साखर उदयोगासाठी मार्गदर्शक ठरले आहेत.
ना.अमित विलासराव देशमुख यांनी सहकार आणि साखर उदयोगामध्ये केलेले कार्य विकासातील सर्वोत्तम योगदान आहे. एवढेच नाही तर सहकार चळवळ आणि साखर उदयोगास दिशादर्शक आहे. परंपरागत साखर उदयोगाने कशी कात टाकावी याचा हा वस्तुपाठच आहे. आधुनिक साखर उदयोगाला दिशा देणारे त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. त्यांच्या वाढदिवसानिमीत्त त्यांना ऊदंड आयुष्य लाभो आणि जनसेवेत त्यांचे नेतृत्व अविरत कार्यरत राहो ही मनपुर्वक शुभेच्छा…!
लेखक
राहूल हरिभाऊ इंगळे पाटील
रा. करकटटा ता.जि.लातूर
मोबाईल : ९८९०५७७१२८
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.