औसा शहरातील व्यवसायिकांसाठी कोरोना चाचणी अनिवार्य - मुख्याधिकारी
औसा प्रतिनिधी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी लातूर यांनी अनेक महत्त्वपूर्ण सूचनांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक यांनी आस्थापनामध्ये काम करणाऱ्या कामगारांना कोरोनाची चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले असून सर्वांनी दि. 21 मार्च पर्यंत covid-19 ची वैद्यकीय चाचणी करून व्यवसाय उद्योग करताना कोरोनाचा अहवाल असणे व अहवाल दुकानाच्या दर्शनी भागात लावणे आवश्यक करण्यात आले आहे. त्यासाठी औसा शहरातील सर्व व्यापारी, व्यावसायिक व छोट्या-मोठ्या उद्योगासह आस्थापनांमध्ये कार्यरत कामगारांची कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन तानाजी चव्हाण, मुख्याधिकारी नगर परिषद औसा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाअन्वे केले आहे. सदर नियमांचे उल्लंघन झाल्यास अशी दुकाने व्यापारी आस्थापना बंद करण्यात येतील असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे..
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.