लसीकरण करूनच शाळा व महाविद्यालय स्थरावर 10 वी 12 वीच्या परीक्षा घ्यावात
विद्यार्थी संभ्रमात ः शेकडो विद्यार्थ्यांचे विभागीय सचिवांना साकडे
लातूर दि.19-03-2021
कोरोणाच्या पार्श्वभूमिवर रूग्णांची संख्या दिवसेंदिवस लातूर जिल्ह्यातही कोरोणाने द्विशतक पार केलेले आहे. त्यातच 10 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांच्या परीक्षाच्या तारखाही जाहीर झालेल्या आहेत. 23 एप्रिलपासून परीक्षेला सुरूवात होत असली तरी विद्यार्थी व पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे एकूण विद्यार्थी संख्या व कोरोणा परिस्थितीचा विचार करता कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमिवर शिक्षकाप्रमाणे विद्यार्थ्यांनाही लसीकरण करूनच त्यांच्या शाळा व महाविद्यालय स्थरावर परिक्षा घेण्यात याव्यात, अशा मागण्याचे निवेदन युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर व शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य माध्य.व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव यांना देण्यात आले.
सद्य परिस्थितीत राज्यभरात कोरोणा रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यातच 10 वी 12 वी विद्यार्थ्यांच्या परिक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. परंतु कोरोणाच्या पार्श्वभूमीवर ठोस अशी उपाययोजना झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे परिक्षेपुर्वी शिक्षकाप्रमाणेच परिक्षेशीसंबंधीत सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात यावे, यामुळे तणावमुक्त वातावरणात परीक्षा पार पडतील, कोरोणाची वाढती स्थिती पाहता. परिक्षा एकत्रित केंद्रावर घेण्यापेक्षा स्वतंत्रपणे प्रत्येक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय स्थरावर घेण्यात याव्या. यामुळे प्रवास व गर्दी कमी होऊन भितीचे वातावरण राहणार नाही. तसेच एकूण गुणाच्या तुलनेत 25 टक्के गुणालाच उत्तीर्ण करण्यात यावे. मंडळच्या पुर्वीच्या नियमाप्रमाणे फक्त एका विषयाकरीता 10 गे्रेस गुण दिले जातात. परंतु सध्याची परिस्थिती लक्षात घेता. फक्त अनुतीर्ण होणार्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक विषयात 10 गे्रस गुण देण्याची व्यवस्था करावी. यामुळे विद्यार्थी अनुर्तीर्ण झाल्यामुळे पुढील शिक्षण थांबविण्याचा धोका कमी होईल. आणि गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही. चालु शैक्षणिक वर्षामध्ये शिकवणीची सुरूवात ऑनलाईन पध्दतीने करण्यात आली. परंतु ग्रामीण आणि राज्यात डोंगराळ भागात इंटरनेटची उपलब्धता मोबाईलची उपलब्धता आणि इतर साधनांची उपलब्धता होत नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अभ्याक्रम पूर्ण करता आलेला नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी व पालक 23 एप्रिल रोजी होणार्या परीक्षेमुळे चिंतेत आहेत. तर काही विद्यार्थ्यांना हे शैक्षणिक वर्ष वाया जाईल की काय? अशी भिती वाटत आहे. त्यामुळे एकूण अभ्यासक्रमापैकी 50 टक्के अभ्यासक्रमावरच परीक्षा घेण्यात याव्यात यामुळे विद्यार्थी व पालकांच्या मनातील भिती कमी होऊन मोकळ्या वातावरणात परीक्षा होतील. शिक्षणाचा लातूर पॅटर्न राबविणार्या लातूर शहरात राज्यातील विविध भागातून विद्यार्थी येत असतात. हे विद्यार्थी वसतीगृहात किंवा भाड्याने राहतात. परंतु कोरोणामुळे हे विद्यार्थी सध्या त्यांच्या मूळ गावी वास्तव्यास आहेत. परंतु परीक्षेसाठी हे सर्व विद्यार्थी पुन्हा परिक्षेसाठी लातूरात येणार असल्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या विद्यार्थी व पालकांना याचा आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपुर्वक विचार करून सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्यासाठी सोयीच्या परीक्षाकेंद्रावर परिक्षा देण्याची मुभा देण्यात यावी. जेणेकरून विद्यार्थ्यांना आरोग्य चांगले राहील व त्यांना आर्थिक झळ बसणार नाही. आदी मागण्याचा समावेश या निवेदनात करण्यात आला यावेळी युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर, अमोल गित्ते, गणेश गोजमगुंडे, सागर घोडके, संतोष ठाकूर, गजेंद्र बोकण, श्रीकांत भराडीया, गोविंद सुर्यंवंशी, संतोष तिवारी, किशोर शिंदे, पंकज देशपांडे, चैतन्य फिस्के, गजानन गंभीरे, कृष्णा बैंकरे, विशाल शिंगण, कुलदीप पवार, शंतनू फडणीस, सुतीत ढोबळे, ओम पंदे, सारंग माळी, तेजस लातूरे, अभिजीत गोमारे, रितेश मिरकले, रोहित कदम, अजिंक्य डोंगरे, सोहम देशमुख, गणेश चामे, ऋषिकेष भताने, रघुनाथ पवार, कृष्णा मदेे्रवार, अमरदीप पवार, महेश हसाळे, आदर्श जैन, संदीप राऊत, मोहित येंजणे, यश भोसले, शुभम मुंडे, संस्कार हाडूळे, हितेश व्यास, ऋषिकेष क्षिरसागर, शाम गुंजोटे, गौरव बिडवे यांच्यासह विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
------------------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.