शांत, सयंमी, धीरगंभीर युवा नेतृत्व: ना. अमित विलासराव देशमुख
भूतकाळातील अनुभवाच्या कसोटीवर तपासून आणि भविष्यातील संभाव्य परिस्थितीचा विचार करून अत्यंत शांतपणे निर्णय घेणारे संयमी, धीरगंभीर आणि प्रगल्भ युवा नेतृत्व म्हणून ना. अमित विलासराव देशमुख यांची आता ओळख निर्माण झाली आहे. वैद्यकीय शिक्षण तथा सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून काम करीत असताना त्यांच्यातल्या या गुणवैशिष्ट्यांचा सर्वांनाच अनुभव येतो आहे. कोणत्याही टीकाटिपणीमुळे विचलित न होता आपल्या कृतीतून या सर्व गोष्टींना उत्तर देणाऱ्या नव्या पिढीतल्या या नेतृत्वाचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांना उदंड दीर्घायुरारोग्य लाभो, या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…!
आपला भारत देश जागतिक महासत्ता बनवायचा असेल तर राजकारणाला वर्ज्य न मानता सुशिक्षित युवा पिढीने या क्षेत्रात सहभागी झाले पाहिजे, असे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे नेहमी सांगत असत. प्राप्त परिस्थितीत राजकीय क्षेत्रातील युवा नेतृत्वाचा वावर आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे अवलोकन केले तर एकूण परिस्थितीत झालेल्या सकारात्मक बदलाची जाणीव आपणाला झाल्याशिवाय राहात नाही. इतर राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकीय पक्षांप्रमाणेच मा. राहुल गांधी यांच्यासारख्या शालीन नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षात नवी पिढी सक्रिय झाल्याचे दिसून येते आहे. महाराष्ट्रातून या नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तरुण राजकारण्यांपैकीच ना. अमित विलासराव देशमुख हे एक युवानेतृत्व आहे.
दहा वर्षांच्या समाजकारणातून ओळख
आपले नाव उच्चारताना किंवा लिहिताना जाणीवपूर्वक पूर्ण नावाचा आग्रह धरणाऱ्या ना. अमित विलासराव देशमुख यांना समाजकारणाचे बाळकडू हे कौटुंबिक वातावरणातूनच मिळालेले आहे. त्यांना आदरणीय विलासराव देशमुख यांच्याकडून मोठा राजकीय वारसाही लाभलेला असला तरी त्यांनी या क्षेत्रात जाणीवपूर्वक स्वकर्तृत्वातून आपली ओळख निर्माण केली आहे. राजकारणात सहजगत्या प्रस्थापित होण्याची संधी असतानाही त्यानी तसे न करता तब्बल १० वर्षे समाजकार्यात व्यस्त राहून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
सन १९९८-९९ दरम्यान विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी करण्याच्या निमित्ताने त्यांचा सामाजिक आणि राजकीय जीवनाशी संपर्क आला. लातूर विधानसभा मतदारसंघात फिरत असताना त्यानी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या, त्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे अभिवचन त्यांनी या वेळी दिले. यानिमित्ताने युवा वर्गाचे मोठे संघटन त्यांनी निर्माण केले. परिणामी लातूर मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे मोठे अनुकूल वातावरण तयार होऊन आदरणीय विलासराव देशमुख एक लाखापेक्षा अधिक मताधिक्य घेऊन विजयी झाले. पुढे ते राज्याचे मुख्यमंत्रीही बनले. संपूर्ण राज्याचा कारभार सांभाळण्यात ते व्यस्त झाले तेव्हा लातूर मतदारसंघात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याची जबाबदारी ना. अमित विलासराव देशमुख यांच्यावर येऊन पडली आणि त्यांनी ती पूर्ण क्षमतेने पारही पाडली.
साखर कारखानदारीतून सुरूवात
पश्चिम महाराष्ट्रा प्रमाणे मराठवाड्यातही सहकारी साखर कारखाने यशस्वी करण्याचा प्रयोग विलासराव देशमुख यांनी मांजरा कारखान्याच्या उभारणीतून चालविला होता, त्यांचा तो प्रयोग यशस्वी तर झालाच शिवाय पुढे तो देशासाठी एक आदर्श ठरला आहे. मांजरा कारखान्याच्या यशस्वी उभारणीतून लातूर परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली. त्यातून १९८८-९९ च्या दरम्यान अतिरिक्त उसाची समस्या निर्माण झाली होती. नुकतेच केमिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केलेल्या अमित देशमुख यांनी शेतकऱ्यांशी हितगूज करीत असताना सदरील समस्या सोडविण्याचा निर्धार व्यक्त केला होता. केवळ निर्धार करून न थांबता सरासरी २५ वर्षे वयाच्या तरुण सहकार्यांना सोबत घेऊन त्यांनी अवघ्या ९ महिन्यांत विलास सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. या कारखान्याची आता नुकतीच १८ वी सर्वसाधारण सभा पार पडली. या कारखान्याने आजवर ५० पेक्षा अधिक राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार पटकावले आहेत. सर्वांत कमी वयाच्या संचालक मंडळाने विक्रमी कमी वेळेत कारखाना उभा करून तो देशात आदर्श ठरावा अशा पध्दतीने यशस्वी रीत्या चालविला आहे, या कारखान्याने स्वफंडातून दुसरा कारखाना विकत घेतला असून तो ही उत्कृष्ट रीत्या चालविण्यात येत आहे, त्यांच्या नेतृत्वात आता टवेन्टिवन शुगर्स लि. ही खाजगी कारखान्याची मालिकाही आकार घेत आहे.
या युवा नेतृत्वाने फक्त कारखाना उभारणीच्या आणि चालविण्याच्या मर्यादेत न थांबता १९९९ ते २००९ या १० वर्षांच्या काळात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, कृषि उत्पन्न बाजार समितीसह बँकिंग, शैक्षणिक, कृषी, सामाजिक,आणि सांस्कृतिक या सर्व क्षेत्रात आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यपद्धतीचा ठसा उमटविला आहे.
या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर सन २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत लातूर शहर मतदारसंघातून त्यांनी एकतर्फी विजय मिळविला. येथून पुढे आजवर त्यांची यशस्वी राजकीय घोडदौड सुरूच आहे. सन २०१२ मध्ये केंद्रीय मंत्रिपदावर कार्यरत असताना आदरणीय विलासरावजी देशमुखसाहेब यांचे आकस्मिक निधन झाले. पितृछत्र हरपल्यानंतर मोठा आधार निखळलेला असताना या परिस्थितीला अत्यंत धीराने सामोरे जात माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कुटुंबाचा सामाजिक आणि राजकीय वारसा ना. अमित विलासराव देशमुख यांनी पुढे सुरू ठेवला आहे.
विजयी हॅटट्रीक
सन २०१४ सली त्यांना अल्पकाळासाठी राज्यमंत्रिपद मिळाले, जेमतेम शंभर दिवसांच्या या कालावधीत मिळालेल्या संधीचं सोनं करणं म्हणजे काय असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यानंतर लगेच आलेली विधानसभा निवडणूक जिंकून ते दुसऱ्यांदा आमदार झाले. राज्यात सत्तांतर झाल्यामुळे त्या पाच वर्षात त्यांनी आमदार म्हणून मतदारसंघाबरोबरच राज्यातील जनतेच्या संपर्कात राहून त्यांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.
सन २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूक त्यांनी लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून पुन्हा सहजगत्या निवडून येऊन विजयाची हॅट्ट्रीक साधली आहे. सोबतच लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून लहान बंधू धिरज विलासराव देशमुख यांनी विक्रमी मताधिक्यांने विजय नोंदवला आहे, हे दोन सख्खे बंधू एकाच वेळी विधानसभेत निवडून जाण्याचा हा दुर्मिळ योग घडवून आणल्याबद्दल राज्याच्या राजकीय क्षेत्रात आजही कुतुहलाने ना. अमित विलासराव देशमुख यांची चर्चा होताना दिसते आहे.
संधीच सोन...
या निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडी घडून शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस यांचे एकत्रित महाविकास आघाडी सरकार सत्तारूढ झाले आहे. महाविकास आघाडीच्या या सरकारमध्ये वैद्यकीय शिक्षण तथा सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी ना. अमित विलासराव देशमुख यांना मिळाली आहे. सोबतीला लातूर जिल्ह्याचा पालकमंत्री पदाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या संधीचेही त्यांनी अल्पावधीत सोनं करून दाखविले आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तारूढ झाले, किमान समान कार्यक्रम निश्चित करून मंत्रिपदाचे वाटप करण्यात आले, सरकारने कामकाजाची धूमधडाक्यात सुरुवातही केली परंतु कोविड-१९ या जागतिक संकटाने संपूर्ण देशाबरोबर महाराष्ट्रालाही ग्रासले आहे. सरकारचे संपूर्ण वर्ष कोविड रुग्णांवरील उपचार आणि लॉकडाऊनचा बंदोबस्त करण्यात गेले आहे. जेथे जास्त प्रगती तेथे कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव हे सूत्र राहिल्याने या संकटाचा देशात सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. कोविड-१९ प्रादुर्भाव काळात वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाने जे काम केले आहे ते सर्वात चांगले उठून दिसले आहे. प्रतिकूल परिस्थितीला संधी समजून ना. अमित विलासराव देशमुख यांनी या काळात जलदगतीने निर्णय घेत त्याची अंमलबजावणीही त्याच गतीने केली आहे. त्यामुळे कोविड रुग्णांची तपासणी आणि उपचार या कार्यात वैद्यकीय शिक्षण विभागाची चांगलीच मदत झाली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाचे शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधन हे मुख्य कार्य असले तरी राज्यातील जनतेच्या अडचणीच्या काळात वैद्यकीय शिक्षण विभागाने कोविड-१९ रुग्णांवरील उपचाराच्या कार्यात महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे. राज्यभरात कोविड रुग्णसंख्येत वाढ होऊन रुग्णालये कमी पडू लागली तेव्हा सर्व वैद्यकीय महाविद्यालयांची रुग्णालये कोविड डेडिकेटेड रुग्णालयात रूपांतरित करण्याचा निर्णय ना. अमित विलासराव देशमुख
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.