अनैतीक संबधातून झालेल्या खूनाचा 12 तासाचे आत उलगडा करून आरोपी गजाआड
दिं.17/03/2021 रोजी सकाळी अकरा वाजण्याचे सुमारास सावरगाव, ता.जि. लातूर शिवारात महेश अनंतराव शिंदे यांचे उसाचे फडात एक मृतदेह असल्याची माहीती फोनवरून मिळाले वरून सपोनि ढोणे हे त्यांचे कर्मचायासह सदर ठिकाणी पोहचून पाहणी केली असता सदर मृतदेहाचे शरीरावर तिक्ष्ण हत्याराचे वार करून खून केल्याचे दिसून आले. सदर मृत व्यक्ती बाबत माहीती घेतली असता मयत हा भागवत रंगराव घुटे, वय 52 वर्ष, रा. कवठा (केज), ता. औसा याचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मयत हा भागवत रंगराव घुटे याचे गावातीलच एका महीले सोबत अनैतीक संबध होते व त्याच रागातून सदर महीलेची दोन मुले विकास व कैलास हिंगे, महीलेचा भाऊ सतीष कांबळे व त्याचा मुलगा पवन सतीष कांबळे यांनी आपसात कट करून दिं.16/03/2021 रोजी सांयकाळचे सुमारास भागवत रंगराव घुटे तिक्ष्ण हत्याराने खून केल्याची तक्रार मयताचा मुलगा किशोर भागवत घूटे यांनी दिल्याने पो. स्टे. मुरूड येथे गुरन 79/2021 कलम 302, 201, 34 भादवि प्रमाणे दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधिक्षक, मा. निखील पिंगळे साहेब, अप्पर पोलिस अधिक्षक हिम्मत जाधव साहेब व उप विभागीय पोलिस अधिकारी प्रिया पाटील मॅडम यांनी तपास अधिकारी सपोनि श्री ढोणे, पो. स्टे. मुरूड यांना तपासासंदर्भाने सुचना दिल्या.
सदर गुन्हयाचे तपासात सपोनि श्री ढोणे व त्यांचे पथकाने आरोपीतांचा शोध घेवून आरोपी नामे सतीष केरबा कांबळे, रा. सावरगाव, कैलास दादाराव हिंगे, रा. कवठा यांना अटक करण्यात आली असून विधीसंघर्षग्रस्त बालक नामे पवन सतीष कांबळे, रा. सावरगाव यास ताब्यात घेवून तपास करण्यात आला आहे. आरोपीतांनी गुन्हा केल्याची कबूली दिली असून आरोपीकडून मयताची मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. गुन्हयातील फरार आरोपी नामे विकास दादाराव हिंगे याचे शोधकामी दोन पथके तयार करण्यात आली आहेत.
सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक, मा. निखील पिंगळे साहेब, अप्पर पोलिस अधिक्षक हिम्मत जाधव साहेब व उप विभागीय पोलिस अधिकारी प्रिया पाटील मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि ढोणे, पोउपनि सुर्वे, पोना/ बहादूरअली सय्यद, रतन शेख, सुधीर सालुंके, महेश पवार यांनी केली असून तपासात 12 तासाचे आत गुन्हा उघडकीस आणून आरोपीतांना अटक करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.